घरदार सोडले; मुले सोडली आणि दर्ग्याचा आश्रय घेतला. मात्र, ‘भरोसा सेल’ने मानसिकरीत्या खचलेल्या महिलेचे समुपदेशन करीत पुन्हा तिचा संसार केला सुखाचा

48

घरदार सोडले; मुले सोडली आणि दर्ग्याचा आश्रय घेतला. मात्र, ‘भरोसा सेल’ने मानसिकरीत्या खचलेल्या महिलेचे समुपदेशन करीत पुन्हा तिचा संसार केला सुखाचा

घरदार सोडले; मुले सोडली आणि दर्ग्याचा आश्रय घेतला. मात्र, 'भरोसा सेल'ने मानसिकरीत्या खचलेल्या महिलेचे समुपदेशन करीत पुन्हा तिचा संसार केला सुखाचा

✍ त्रिशा राऊत ✍ नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं. मो 9096817953

नागपुर . आई-वडिलांच्या मनाविरूध्द जाऊन प्रेमविवाह केला. काही वर्षे सर्वकाही सुरळीत असताना पतीच्या वागण्याने तिला जबर धक्का बसला. पती दुसऱ्या महिलेच्या प्रेमात अडकल्याची कुणकूण लागल्याने तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
घरदार सोडले; मुले सोडली आणि दर्ग्याचा आश्रय घेतला. मात्र, ‘भरोसा सेल’ने मानसिकरीत्या खचलेल्या महिलेचे समुपदेशन करीत पुन्हा तिचा संसार सुखाचा केला.

आजकालचे तरुण-तरुणी अनेकदा आई-वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न करून संसार थाटतात. याचप्रमाणे मधू (बदललेले नाव) हिनेही एका ऑटोरिक्षा चालकाशी प्रेमविवाह केला. त्यामुळे आईवडिलांनी तिच्याशी नातेसंबंध तोडून दिले. पोलिस होण्याची इच्छा असताना अचानक लग्न करावे लागल्याने तिने आपले स्वप्नांना आवर घातली. लग्नानंतर पती आणि मुले सांभाळण्यात ती रमली. मात्र, अचानक एक दिवसपती आपली फसवणूक करून दुसऱ्याच महिलेशी संबंध ठेवत असल्याचे तिने बघितले. त्यामुळे दुःखी झाल्याने तिने पतीला त्यागण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच तीने घर सोडून दिले. राहायला जागाच शिल्लक नसल्याने तिने तब्बल दोन ते तीन दिवस मीठानिम दर्ग्याचा आसरा घेतला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. मानसिकरित्या संपूर्णतः खचलेल्या मधूचे भरोसा सेलमार्फत समुपदेशन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. तिच्या पतीलाही बोलावून त्याचेही समुपदेशन करण्यात आले. त्यातून पतीनेही पत्नीची साथ देण्याची हमी दिली. त्यातून दोघांनीही एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही सुखाने नांदत आहेत काय?याबाबत नियमित पोलिस आढावा घेत आहेत.भरोसा सेलमध्ये मोठ्या प्रमाणात समुपदेशासाठी प्रकरणे येत असतात. त्यातून प्रत्येक प्रकरणासाठी किमान एक ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, मधूचे प्रकरण अधिक गंभीर असल्याने सेलद्वारे ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.मधूला ला (बदललेले नाव) अगदी सुरुवातीपासून पोलिस खात्यात जाण्याची इच्छा होती. प्रेम आणि त्यातून पुढे संसार यातून तिने आपल्या स्वप्नाला विराम दिला. मात्र, आताही तिच्या हातात वेळ असल्याने भरोसा सेलमधील पोलिसांनी तिच्या स्वप्नपूर्तीसाठी हवी ती मदत करण्याचेही आश्‍वासन दिले.