रायगड जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

50
रायगड जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

रायगड जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

रायगड जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वित

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड – मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहीमे प्रमाणे संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासाठी “स्वतंत्र कक्ष” कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात जुन्या शासकीय दस्तावेजची तपासणी तसेच मराठा- कुणबी नोंदी शोधण्यात येत आहेत.रायगड जिल्हा महसूल प्रशासन जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा महसूल दप्तरी असलेल्या नोंदी, कागदपत्रे तपासणी आणि उपलब्ध कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी कार्यान्वित झाली आहे.

विशेष कक्षाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) विठ्ठल इनामदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी काम करीत आहेत. जिल्हाधिकारी डॉ म्हसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी या मोहिमेवर विशेष लक्ष ठेवून आहेत. या कक्षामार्फत
शासनाला मराठा आरक्षण संदर्भात इमपेरियल डाटा संकलित करण्यासाठी सहाय्य करणे. कुणबी जाती संदर्भात जात प्रमाणपत्र देण्यासाठी जे काही पुरावे असतील ते तालुका स्तरावरुन संकलित करुन जात
प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सूचना देणे. तालुकास्तरावरुन कुणबी बाबत पुरावे तपासणी करणे तपासण्यात आलेले दस्ताऐवज व सापडलेले पुरावे याची आकडेवारी घेणे. तसेच संबंधित पुरावे मोडीलीपी वाचकाकडून
प्रमाणित करुन घेणे तसेच जिल्हास्तरावर एकत्रित “Data Bank” तयार करणे व जिल्हा माहिती स्थळावर प्रसिध्द करणे ही या कक्षाची कामे असणार आहेत.राज्यभरातील या कामाच्या संनियत्रणासाठी मंत्रालयस्तरावर देखील अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.