दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे निर्देश— महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे

53
दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे निर्देश--- महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड – महाड तालुक्यातील बिरवाडी येथील ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीमध्ये आग लागल्याने झालेल्या दुर्घटने मधील मृत कामगारांच्या पाल्यांना
बालसंगोपन योजनेचा तात्काळ लाभ देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिले.

ब्ल्यू जेट रासायनिक कंपनीतील स्फोटाने झालेल्या दुर्घटनेची सविस्तर माहिती कु. तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. या दुर्घटनेतील 11 लोक बेपत्ता आहेत. यापैकी 7 मृतदेह मिळाले असून उर्वरित लोकांचा शोध सुरु आहे.या दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.या योजनेतंर्गत प्रती बालक दरमहा 2 हजार 250 रु परिपोषण अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र,निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इ. सुविधा पुरविण्यात येतात.