महाड एम आय डी सी मध्ये केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत 9 कामगारांचा होरपळून मृत्यू तर दोन कामगार बेपत्ता मृत्तांच्या कुटुंबीयांना 35 ते 45 लाखांची मदत जाहीर ..
हिरामण गोरेगावकर
रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड MIDC तील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 9 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर उर्वरित दोन कामगार अद्याप बेपत्ता आहेत. महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत आग लागली होती. त्यामध्ये 11 कामगार अडकले होते. गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची माहिती आहे. मृतांच्या कुटुंबियांना जवळपास 35 ते 45 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जेट इन्सूलेशन या कंपनीत शुक्रवारी (3 नोव्हेंबर) सकाळी भीषण स्फोट झाला. त्यामध्ये अडकलेल्या 11 कामगारांपैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत कामागारांच्या कुटुंबीयांना अधिकाधिक मदत देणार असल्याचं मंत्री उदय सामंत म्हणाले होते. आता या कामगारांच्या कुटुंबीयांना 35 ते 45 लाखांची मदत दिली जाणार आहे .शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आणि स्फोट झाल्यानंतर 11 जण बेपत्ता होते. त्यातले काही बाहेर आले असतील अशी शक्यता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. संबंधित कंपनीच्या मालकाशी देखील चर्चा करून जास्तीत जास्त मदत करण्याचे निर्देश सामंत यांनी यावेळी दिले .
पूर्ण फॅब्रिकेशन वर्क असल्यामुळे स्टीलचं वर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झालेली आहे. केमिकल क्षेत्रातील आपत्ती असल्यामुळे कामात काही अडचणी येत आहेत. या ठिकाणी अजूनही केमिकल असू शकते अशी एनडीआरएफची माहिती आहे. एनडीआरएफकडून मदत कार्य सुरू आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.
ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगडमधील महाड MIDC मध्ये आहे. या कंपनीत सकाळी 11 च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटच असल्याचं क्षणार्धात लक्षात आलं या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरू झाली.आधी गॅस गळती झाली की स्फोट झाला या बाबत अद्याप माहिती नाही.मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरू झाल्याने सर्वत्र आग पसरू लागली. या स्फोटानंतर क्षणार्धात आगीने पेट घेत सगळी कडे आज पसरली त्यामुळे सगळी कडे खळबल उडाली या घटनेत आता पर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला तर 2 कामगारांचा शोध सुरू आहे.