नाशिक अंँटीकरप्शनची मोठी कारवाई, अहमदनगरच्या दोन अभियंत्याना तब्बल १ कोटीची लाच घेताना अटक

56

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

भगवान पगारे
नाशिक: अंँटीकरप्शन ब्युरोने मोठी कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली केली असून अहमदनगरच्या दोन अभियंत्याना तब्बल १ कोटीची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर एमआयडीसीचे उपअभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांना लाच घेतल्या प्रकरणी अटक केली आहे.

नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधीशकपदी शर्मिष्ठा वालावालकर आल्यानंतर सगळ्याच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यांची धडक कारवाई करण्याची पद्धत तसंच कुणाचीही तमा न बाळगता कर्तव्यात कसून न करण्याचा बाणा असल्यानं त्यांचा दरारा पूर्वीपासून आहे. आता त्यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. राज्याच्या अँटी करप्शन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर यांच्या पथकाचं अहमदनगर एमआयडीसीचे उपअभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन विभागीय अभियंता गणेश वाघ यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.

शर्मिष्ठा वालावलकर यांची धडाकेबाज कारवाई

अहमदनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकानं तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांच्यासह तत्कालीन सहाय्यक उपअभियंता गणेश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने १००० एम एम व्यासाचे पाईप टाकण्याचं काम केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचं काम केले. या कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बिल मिळावे, म्हणून सदर बिलावर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचं आउटवर्ड करुन त्याच्या सह्या घेण्यासाठी तसेच देयकं पाठवण्याच्या मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ यांच्यासाठी या बिलाच्या कामाचं व यापूर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची लाच म्हणून १ कोटी रुपये लाचेची मागणी केली होती, तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास १ कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील ५०% वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड याने दिली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर, माधव रेड्डी, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, संदिप हंडगे, सुरेश चव्हाण आदींनी ही मोठी कारवाई केली आहे.