देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठी लागलेली कीड म्हणजे भ्रष्टाचार – विश्वास नागरे पाटील

57

भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाईत संपूर्ण राज्यात नाशिक परिक्षेत्र आघाडीवर

भगवान पगारे
नाशिक : केंद्रीय दक्षता आयोगाच्या आदेशानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने राज्यभरात दि. ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरोधी जनजागृती दक्षता सप्ताह निमित्त सर्व सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, कारण देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठी लागलेली कीड म्हणजे भ्रष्टाचार असल्याचे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक विश्वास नागरे पाटील यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, देशाच्या प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा असून तो नष्ट करण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, लाच देणे आणि घेणे हे दोन्ही गुन्हे आहेत, भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी प्रतिबंधक विभाग राज्यांमध्ये व्यापक स्तरावर कारवाई करीत असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाईत संपूर्ण राज्यात नाशिक परिक्षेत्र आघाडीवर आहे, नाशिक परिक्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात १४० सापळ्यांमध्ये या विभागाने १९९ आरोपींना अटक केली आहे, तर संपूर्ण राज्यात गेल्या वर्षभरात ७०० पेक्षा जास्त सापळे लावून कारवाई करण्यात आली आहे,

दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदनगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून एक कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना अटक केली आहे, असेही विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले, पत्रकार परिषदेस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, नंदूरबारचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, जळगावचे उपअधीक्षक सुहास देशमुख, धुळ्याचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, नाशिकच्या उपअधीक्षक वैशाली पाटील पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवे, नेत्रा जाधव, नरेंद्र पवार यांच्यासह विभागातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.