ठाणेकरांचा रेल्वे प्रवास वर्षा अखेर अधिक सुखकर आणि गर्दीमुक्त होणार

113

ठाणेकरांचा रेल्वे प्रवास वर्षा अखेर अधिक सुखकर आणि गर्दीमुक्त होणार

संजय पंडित

दि.३,ठाणे : ठाणेकरांचा प्रवास वर्षा अखेर सोप्पा व गर्दीमुक्त होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने ठाणेकरांसाठी एक मोठी योजना आखली आहे. लवकरच मध्य रेल्वेकडून ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. जेणेकरुन १५ डब्यांच्या लोकल तिथे थांबू शकणार आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. ठाणे स्थानकातील वाढलेली प्रवासीसंख्या पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक २,३ आणि ४ येथे फलाट रुंदीकरणाचे काम होणार आहे. प्लॅटफॉर्म २ हा १६.१५ मीटर, तर ३ आणि ४ प्लॅटफॉर्म ४९ मीटर रुंद करण्यात येणार आहे. एकदा का हे काम झालं तर १२ डब्यांच्याऐवजी १५ डब्यांच्या लोकल चालवल्या जाणार आहे. ठाण्यातून सध्या 5 लाख प्रवासी प्रवास करतात. फलाटाची रुंदी वाढवल्यानंतर त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. ठाणे स्थानकातील गर्दीदेखील कमी होणार आहे.

ऑफिसची वेळात स्थानकात मोठी गर्दी असते. अशावेळी ट्रेनमध्ये बसायला सीटदेखील मिळत नाही. कधीकधी तर गर्दी इतकी असते की उभं राहायलादेखील जागा मिळत नाही. गर्दीमुळं अपघात होण्याची शक्यता असते. १५ डब्यांची लोकल सुरू झाल्यानंतर गर्दी विभागण्याची शक्यता आहे. तसंच, लोकलच डबे वाढल्याने गर्दीमुक्त प्रवास होण्याची शक्यता आहे. कर्जत , कसाराहून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे फायदेशीर आहे.

मध्य रेल्वेने याआधीही ठाणे स्थानकात विविध पायाभूत सुविधांची घोषणा केली होती. मे २०२४ मध्ये प्लॅटफॉर्म ५ १० मीटर ते १३ मीटरपर्यंत रुंदीकरण केले आहे. जेणेकरुन स्थानकातील गर्दी कमी होणार आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर, प्रवासी संघटनांनी वाढत्या प्रवाशांच्या संख्येला तोंड देण्यासाठी विरार आणि डहाणू दरम्यान १५ डब्यांच्या गाड्या सुरू करण्याची विनंती रेल्वे अधिकाऱ्यांना केली आहे. पण विरार आणि डहाणू दरम्यानच्या ६३ किलोमीटरच्या मार्गाची चौपट करण्याचे काम सुरू असल्याने २०२५ पर्यंत ही समस्या सुटेल असे आश्वासन दिले आहे.

पूर्ण झाल्यानंतर, मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कमधील विस्तार आणि वाढीव सेवांमुळे लाखो प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवास सुरक्षित, जलद आणि खूपच कमी ताणतणावपूर्ण होण्याची अपेक्षा आहे.