486 ग्रॅम गांजा जप्त, हिंगणघाट पोलिस स्टेशनची कार्यवाही.
मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:- शहरात आज मोठ्या प्रमाणांत गांजाची तस्करी आणी विक्री होत असल्याची चर्चा सुरु आहे. हिंगणघाट कधी नशा मुक्त गांजा मुक्त होणार याकडे सर्व शहरवासीयाचे लक्ष लागलेले आहे.
हिंगणघाट पोलिस स्टेशनला खबरीने माहिती दिली की टाका मस्जिद येथून एक इसाम लाल रंगाच्या पिशवीमध्ये गांजा घेऊन येत असल्याची माहिती हिंगणघाट पुलिस विभागाच्या डी पी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार टाका मस्जिद परीसरातील रोड वर सापळा रचुन आरोपी सय्यद तौसिफ सय्यद बब्बु वय 22 वर्ष राह. टाका मस्जिद, संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट याला रंगेहात गांजा घेऊन जात असताना पकडल. आरोपी सय्यद तौसिफ सय्यद बब्बु यांचा कडुन 486 ग्रॅम गांजा जप्त करुन त्यांच्या विरुध्य पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे एन.डी.पी.एस कलमा खाली गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी सय्यद तौसिफ सय्यद बब्बु याला पोलिस कस्टडी मिळाली असुन, पुढील तपास सपोनी प्रशांत पाटणकर करत आहे.
ही कारवाई प्रशांत होळकर पोलिस अधिक्षक वर्धा, पियुश जगताप प्रभारी उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट, पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत पाटणकर, डी पी पथकाचे शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे, संचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भालशंकर, वीरेंद्र कांबळे, संदीप बदकि, यांनी केली