टीव्ही बघतो म्हणून सावत्र आई रागावल्याने 13 वर्षीय मुलाने घेतला गळफास….

55

टीव्ही बघतो म्हणून सावत्र आई रागावल्याने 13 वर्षीय मुलाने घेतला गळफास….

हिरामण गोरेगांवकर

पुणे 04/12/2020: टीव्ही बघतो म्हंणून सावत्र आई रागावल्याने 13 वर्षीय मुलाने आत्महत्या पुण्यामध्ये चिखली येथे घडली. रमजान अब्दुल शेख ( रा. जाधववाडी. चिखली ) असं या मुलाचं नाव आहे. या घटनेचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

रमजान हा टीव्ही वर तासंतास कार्यक्रम बघत बसायचा. यावरून त्याची सावत्र आई त्याला रागवली. आई रागवली म्हणून मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास रमजनने ओढणीने गळफास घेतला. घरात बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्याच्या घरच्यांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला वाय सी एम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तेथील डॉटरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.