*गुटख्यातील हवाला रॅकेटचा पर्दाफाश,3 कोटी 47 लाखांची रोकड जप्त,9 जणांना अटक*

56

*गुटख्यातील हवाला रॅकेटचा पर्दाफाश,3 कोटी 47 लाखांची रोकड जप्त,9 जणांना अटक*

*पुणे* – शहरात बेकायदा गुटखा विक्रीतून मिळालेली मोठ्या रकमेची देवाण-घेवाण हवाला मार्फत करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. गुन्हे शाखेने पाच ठिकाणी छापे टाकून 3 कोटी 52 लाख 74 हजारांचा ऐवज जप्त करीत नऊ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये 3 कोटी 47 लाख 38  हजारांची रोकड आहे.

यापुर्वी मुख्य आरोपी सुरेश मूलचंद अगरवाल (वय 54, रा. खराडी) याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काल रात्री आणखी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

खराडीत बेकायदा गुटख्याची विक्री करणा-या सुरेशला पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत त्याने नवनाथ नामदेव काळभोर गुटखा पुरवित असल्याची कबुली दिली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत गुटख्याचे मुख्य दोन विक्रेते असून हवाला मार्फत पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर काल सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पाच ठिकाणी छापे टाकून 3 कोटी 52 लाख 75 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.