नागपुर पाण्याची पाइप लाइन फुटल्या मुळे लाखो लिटर पाणी वाया.

54

नागपुर पाण्याची पाइप लाइन फुटल्या मुळे लाखो लिटर पाणी वाया.

पल्लवी मेश्राम नागपुर प्रतिनिधी
नागपुर:- आज नागपुर मधिल कलमना फ्लाय ओवरच्या आत येणा-या रस्त्यावर पाण्याची पाइप लाइन फुटल्या मुळे तिथे सर्वत्र पाणीच पानीमय झाले. जीथे पाणी जमा झाले त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. रात्री त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे कुठल्याही क्षणी मोठ्या अपघात हाऊ शकतो. मनपा प्रशासना आणी स्थानिक नगरसेवक याकडे लक्ष देत नाही. त्यामूळे मोठ्या प्रमाणात जनता नाराज दिसून येत आहे.

प्राप्त माहिती नुसार आज नागपूर मधिल कलमना फ्लाय ओवरच्या आत येणा-या रस्त्यावर पाण्याची पाइप लाइन फुटल्या मुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी बर्बाद झाले. कोन याला जबाबदार? दर वर्षी शासन पाणी वाचवण्याकरिता करोड़ो रुपये योजनेच्या माध्यमातुन खर्च करत असते. पण महानगर पालिकाचा भोंगळ कारभारामुळे या योजना जमिनीवर उतरत नाही. अनेक वर्षा पुर्वीच्या पाणी पाईप लाईन मरमत करुन तातपूर्ती उपायोजना केली जाते. पण परत काही महीण्यानंतर जैसे थे अशी परर्स्थीती दिसून येते.