संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीमेला प्रारंभ. आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन.
युवराज मेश्राम प्रतिनिधी
नागपुर:- जिल्हातील नरखेड तालूक्यातील मोवाड सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत संपुर्ण नरखेड तालुक्यात संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत असुन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मोवाड अंतर्गत उपकेंद्र खैरगाव येथे ता. 1 ला सदर मोहीम जेष्ट शिक्षक काळे
गुरूजी, तालुका आरोग्य अधीकारी डाॅ. विद्यानंद गायकवाड, डाॅ. प्रविण उमरगेकर व डाॅ. संजय सोळंकी वैद्यकीय अधीकारी मोवाड यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत खैरगाव येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरूवात करण्यात आली.
महाराष्र्ट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सर्व जनतेची क्षयरोग तसेच कुष्ठरोग या दोन दूर्धर आजारापासुन सुरक्षिततेसाठी दि. 1 डिसेंबर ते 26 डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार्या या मोहीमेसाठी तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक श्री. दांडगे, ग्रामविकास अधीकारी एस. यु. भक्ते, आरोग्य सेवक प्रशांत विरखरे, आरोग्य सेविका कु. के. एम. श्रीरामे, तसेच गावातील सर्व आशा वर्कर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थीती व मार्गदर्शन लाभले.
मोहीमे दरम्यान गावकर्यांच्या घरोघरी जाउन या आजाराची तपासणी करण्यात येत असुन त्याची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहे. दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला व शरीरात ताप राहणे, वजनात लक्षणीय घट व भुक न लागणे, तसेच मानेवर येणार्या गाठी हे सर्व क्षयरोग व (टी. बि.) ची लक्षणे असु शकतात. त्याचप्रमाणे अंगावरील लाल संवेदना रहीत चट्टा, मऊ व चकाकणारी तेलकट त्वचा, तसेच अंगावरील गाठी हातापायांमध्ये बधिरता व शारीरीक विकृती हे सर्व कुष्ठरोगाची लक्षणे असु शकतात. त्यासाठी मोहीमे दरम्यान आपणाकडे तपासणी साठी येणार्या प्रशीक्षित सेवकांना सहकार्य करावे.
येणार्या प्रशीक्षित स्वयंसेवकाकडुन तपासणी करून आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आवाहन मोवाड प्रा. आ. केंद्राचे आरोग्य सेवक प्रशांत विरखरे यांनी नागरीकांना केले आहे.