भरधाव ट्रॅव्हल्स उभ्या कंटेनरवर आदळली; चालकासह दोन
पांढरकवडालगत राज्य महामार्गावर ट्रॅव्हल्स कंटेनर दुर्घटना
यवतमाळ:- नेपाळवरून चेन्नईकडे मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पांढरकवडालगत राज्य महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या चालकासह दोनजण ठार झाले, तर अनेक प्रवासी जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
जखमींपैकी एकाच्या पोटाला जबर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले, तर उर्वरित जखमींवर पांढरकवडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी व मृतांची नावे अद्याप कळू शकली नाही.