विदर्भ राज्य आंदोलन समिती 4 तारखेला होणाऱ्या उर्जामंत्र्याच्या घराला नागपूर येथे घेराव, 7 तारखेला होणाऱ्या विदर्भभर ठिय्या आंदोलन
7 तारखेला वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, समुद्रपुर, पुलगाव, आर्वि व सेलु येथे ठिय्या आंदोलन होणार असुन स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी तसेच कोरोनाकाळातील सम्पुर्ण विजबिल माफ करण्यात यावे तसेच विदर्भातील जनतेला विजबिलाचे दर निम्मे करा तसेच शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने दिवसा विज मोफत द्यावी या मागण्या असुन…प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
वर्धा:- दिनांक 3 तारखेला वर्धा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडी प्रमुख रंजनाताई मामर्डे, विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर कमिटी सदस्य मधुसूदन हरणे, शेतकरी संघटना वर्धा जिल्हाध्यक्ष ऊल्हास कोटमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बैठक झाली या बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी वर्धा जिल्हा प्रमुख सचिन डाफे, वर्धा तालुका युवा आघाडी प्रमुख मुकेश ठाकुर, वर्धा शहर महिला आघाडी प्रमुख माधुरी ताई पाझारे, युवती आघाडी प्रमुख नंदा प्रजापती,वर्धा शहर युवा आघाडी प्रमुख विशालसिंह कछवाह, प्रकाश मसराम, वैभव तिजारे व इतर कार्यकर्ते हजर होते या बैठकीदरम्यान 7 तारखेला होणाऱ्या विदर्भभर ठिय्या आंदोलनाकरीता वर्धा जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यात आला व 4 ला होणाऱ्या उर्जामंत्र्याच्या घराला नागपूर येथे घेराव आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
7 तारखेला वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, समुद्रपुर, पुलगाव,आर्वि व सेलु येथे ठिय्या आंदोलन होणार असुन स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी तसेच कोरोनाकाळातील सम्पुर्ण विजबिल माफ करण्यात यावे तसेच विदर्भातील जनतेला विजबिलाचे दर निम्मे करा तसेच शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने दिवसा विज मोफत द्यावी या मागण्या असुन या ठिय्या आंदोलनाकरीता आपल्या जवळच्या भागातील ठिय्या आंदोलनात विदर्भातील जनतेने व तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सचिन डाफे, मुकेश ठाकुर, नितीन सेलकर, सतिश दाणी, प्रमोद तलमले, प्रफुल झाडे, अंगद चौधरी, मिलिंद वर्हाडे, महादेव गोहो, प्रकाश मसराम, जिवन गुरनुले, पंकज साबळे , गणेश मुटे, मुकेश धाडवे , सारंग धरणे, प्रफुल सयाम व कार्यकऱ्यांनी केले आहे