काचनगाव येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असल्या १४ वर्षी मुलीचा विहिरीत आढळला मृतदेह: सर्वत्र खळबळ

54

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

आज शुक्रवारी ३ डिसेंबरला हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव येथे दोन दिवसांपासून घेऊन बेपत्ता असल्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने गावात सर्वत्र खळबळ उडाली आहे.मृत्यक मुलीचे नाव भूमिका दशरत महाजन वय १४ वर्षं असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १ डिसेंबरला भुमिका शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते ती आई सोबत पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली त्यांनतर ती शेतातून निघून गेली मात्र त्यानंतर ती घरी परत आली नसल्याने तिचा कुटुंबाकडून सर्वत्र शोध घेतला यासंबधी वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती पोलिसांनी सुध्दा भुमिकाचा शोध सुरू केला होता.ती मिळून आली नाही.आज शुक्रवारी ३ डिसेंबरला भुमिकाचा मृतदेह गाव काचनगाव विहिरीत आढळून आला घटनेची घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बागडे पोलिस कर्मचारी उमेश ठोंबरे , मनोज धात्रक, लक्ष्मण केंद्रे, यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला मात्र १४ वर्षाच्या भुमिकावर असं कोण्हंत संकटं ओढवल होत की तीने आत्महत्याला कवटाळले यांचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी विहिरी जवळ बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.भुमिकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.