दोन दोन गुन्हे दाखल असताना मिळकतखार खाडीकिनारी पुन्हा अनधिकृत भराव.

दोन दोन गुन्हे दाखल असताना मिळकतखार खाडीकिनारी पुन्हा अनधिकृत भराव.

दोन दोन गुन्हे दाखल असताना मिळकतखार खाडीकिनारी पुन्हा अनधिकृत भराव.

ग्रामस्थांची जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग तालुक्यांतील रेवस बंदराजवळील मिळकतखार येथील खाडीमध्ये बेकायदेशीर भरावाचे प्रकरण गेली 10 वर्षे गाजत आहे. प्रत्येक वेळी धनदांडगे कांदळवनांवर, सी.आर.झेड मध्ये नो-डेव्हलपमेंट क्षेत्रात बेकायदार भराव करण्याची सुरूवात करतात व ग्रामस्थांसह काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येवून हे काम थांबवितात. पर्यावरण रक्षणसाठी तसेच भविष्यात होणा-या पुरस्थितीतीपासून गावे वाचविण्यासाठी ग्रामस्थ जिवाची बाजी लावून हे बेकायदार काम थांबवितात परंतु सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनीधी मात्र वारंवार या गंभीर परिस्थतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षात सन 2014 व सन 2022 मध्ये दोन गुन्हे सबंधीतांविरूध्द मांडवा सागरी पोलीस ठाण्यात दाखल असूनही धनदांडगे पुन्हा पुन्हा या ठिकाण भराव करून खाडीकिनारील गावे बुडवायला निघाले आहेत असा थेट आरोप अलिबाग येथील संजय सावंत यांनी केला आहे. अलिबागचे तहसिलदार विक्रम पाटील यांची भेट घेवून त्यांना या प्रकाराबाबत कल्पना दिली. ग्रामस्थांनी दोनच दिवसांपूर्वी आपल्या कार्यालयाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे असे सांगितले. त्यावर तहसिलदार यांनी संबधीत मंडळ अधिकारी व तलाठी यांना योग्य त्या सूचना देण्यांत आल्या आहेत असे सावंत यांना आश्वासीत केले.

प्रकरण काय?
अलिबाग तालुक्यांतील रेवस बंदराजवळील मिळकतखार येथील खाडीमध्ये बेकायदेशीर भराव केल्या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात वासवानी रिसॉर्ट तर्फे कार्यकारी संचालक यांच्यावर सन 2014 मध्ये गुन्हा दाखल असताना याच जागेत पुन्हा माती भराव सुरू झाला असून याबाबत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. कॉंग्रेसचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर व मिळकतखार येथील ग्रामस्थांनी सन 2014 मध्ये या अनधिकृत भरावाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महसूल विभागाचे तत्कालीन मंडळ अधिकारी श्रीकांत कवळे यांनी स्थळ पहाणी करून पर्यावरण अधिनियम 1986 चे कलम 15 व प्रादेशीक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 अन्वये वासवानी रिसॉर्ट तर्फे कार्यकारी संचालक, जनक हरकिसनादास वासवानी यांच्यावर शासनातर्फे मांडवा सागरी पोलीस ठाण्यात क्र.05/2014 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा सन 2022 साली याच कारणासाठी त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. संजय सावंत यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार नगर रचना आणि मुल्य निर्धारण विभाग रायगड अलिबाग यांनी त्यांच्या दि. 20 डिसेंबर 2014 च्या तहसिलदार अलिबाग यांना दिलेल्या अहवालामध्ये मिळकतखार येथील भराव हा अनधिकृतपणे केला असल्याचे निर्देशनास आले होते. या माती भरावामुळे सीआरझेड चे उल्लंखन झाल्याचे निदर्शनास आले आहे असे नमूद केले आहे. असे असतानाही पुन्हा या जागेत अनधिकृत भराव करून सी.आर.झेड व पर्यावरण कायदयाचे उल्लंघन केल्या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापनासोबतच जबाबदार महसूल अधिका-यांवरही गुन्हा दाखल करण्यांत यावा अशी मागणी संजय सावंत यांनी कोकण आयुक्तांकडे केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here