बल्लारपुरात 3 बंदूक, 18 जिवंत काडतूस जप्त

बल्लारपुरात 3 बंदूक, 18 जिवंत काडतूस जप्त

बल्लारपुरात 3 बंदूक, 18 जिवंत काडतूस जप्त

📍पाच आरोपी अटकेत
📍बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

विसापूर : 4 डिसेंबर
बल्लारपूर शहरातील एका घरून 3 बंदूक व 18 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवार, 4 डिसेंबर रोजी बल्लारपूर पोलिसांनी केली.
आरोपींमध्ये मुकेश उर्फ मुक्कु विश्वनाथ हलदर (28), अमित दिलीप चक्रवती (34), जितेंद्रसिंग उर्फ निक्कु गोविंदसिंग डिलोन (29), संघर्ष उर्फ गोलू बंडू रामटेके (27), काश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी (20) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
बल्लारपुरातील गुन्हेगारी आटोक्यात यावी यासाठी पोलिस विभाग सतर्कतेने कारवाई करत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीची पाळेमुळे खोदून गुंडांना धडा शिकविण्याच्या अनुषंगाने मोहिम हाती घेतली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील गाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एस. टोपले, उपनिरीक्षक हुसेन शाह, आनंद परचाके, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, रणविजय ठाकूर, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here