अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 4 डिसेंबर
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 4 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रपूर-मूल महामार्गावरील वनविकास महामंडळाच्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 415 मध्ये घडली.
मृत बिबट मादी असून, तो दोन ते अडीच वर्षाचा असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. बोथे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी ए. वाय. मरस्कोल्हे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. बोथे यांच्यासह वनाधिकार्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृत बिबट्याला चंद्रपूर येथील ‘ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’ येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरीय तपासणी केली.