निन माजी पोलीस हवालदारांचा आत्मदहनाचा इशारा; प्रशासनाकडून निर्णयाची प्रतीक्षा..*

*तीन माजी पोलीस हवालदारांचा आत्मदहनाचा इशारा; प्रशासनाकडून निर्णयाची प्रतीक्षा..*

निन माजी पोलीस हवालदारांचा आत्मदहनाचा इशारा; प्रशासनाकडून निर्णयाची प्रतीक्षा..*

 

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

कर्जत :- रायगड जिल्ह्यातील तीन माजी पोलीस हवालदारांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा दिला आहे. प्रल्हाद पांडुरंग पाटील, प्रशांत आशोक कांबळे, आणि रवींद्र अंबु राठोड यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे निवेदन दिले आहे.
संबंधित माजी पोलीस हवालदारांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत स्वतःला निर्दोष ठरवण्यात आले असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी न्यायालयाच्या सर्व प्रतिकांनी व विभागीय चौकशीतील निष्कर्षांनी आपल्याविरुद्ध कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यांना सेवेत पुन्हा रुजू करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सदोष निर्णय घेतला जाईल किंवा त्यांचा अर्ज मान्य केला गेला नाही तर २६ जानेवारी २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यासमोर, शासकीय कार्यालयासमोर किंवा लोकप्रतिनिधींच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही
माजी पोलीस हवालदारांच्या या गंभीर निवेदनावर रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सामाजिक स्तरावर या विषयावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप गरजेचा
आंदोलनाची वेळ येण्याआधी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, आमदार, खासदार, आणि मानवी हक्क आयोगाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आत्मदहनासारख्या टोकाच्या पावलांवर न जाता चर्चा आणि निर्णयाद्वारे योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. “जर आम्हाला वेळेत न्याय मिळाला नाही, तर आमच्या जीविताला धोका पोहोचल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल,” असा स्पष्ट इशारा तिन्ही माजी पोलीस हवालदारांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here