हिंगणघाट मध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघे ठार.
देव दर्शन करण्याकरिता गणपती-पुळेला जाण्यासाठी निघालेले तरुण, पण वाटतेच काळाचा घाला; एकाच गावातील चौघे ठार. पाच लोकं गंभीर जखमी.
हिंगणघाट:- नागपुर – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग 7 वर काल रात्री हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती समोर भरधाव बोलेरो चार चाकीने गाडीने उभ्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की बोलेरो गाडी पुर्ण चेंंदा मेंंदा झाली. या अपघाता मध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान सेवाग्राममध्ये मृत्यू झाला. तसेच पाच जण गंभीर रित्या जखमी आहेत.
वाहन चालक शैलेश पंढरी गिरसावळे वय 26 वर्ष, आदर्श हरीभाऊ कोल्हे वय 17 वर्ष, सूरज जनार्दन पाल वय 21 वर्ष आणी मोहन राजेंद्र मोंढे वय 22 वर्ष असे मृतकाचे नावे असून हे सर्वजण उमरेड तालुक्यातील हिवरा-हिवरी येथील रहिवासी होते. तर, यश कोल्हे वय 12 वर्ष, भूषण राजेंद्र खोंडे वय 24 वर्ष, शुभम प्रमोद पाल वय 23 वर्ष, प्रणय दिवाकर कोल्हे वय 15 वर्ष, समीर अरुण मोंढे वय 16 वर्ष असे गंभीर जखमींचे नावे आहे. हे सर्वजण रात्री हिवरा – हिवरी येथून देव दर्शन करण्याकरीता गणपती – पुळेला चालले होते. हिंगणघाटमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरच्या रेल्वे पुलावरून रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास बोलेरो चारचाकी गाडी भरधाव वेगाने खाली उतरत असताना हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रोडच्या लागत बंद ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
सध्या या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे रोड हा अगदी छोटा झाला आहे. आणी रोडची अवस्था पण खुप खराबस्थितीत दिसून येत आहे. नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता वळविला आहे. त्यामुळे हा अपघात झाला. अपघात होताच हिंगणघाट शहरातील काही समाजिक कार्यकर्त्यानी जखमी मुलांना गाडीतून काढून हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. यापैकी तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत चव्हाण घटनास्थळी पोहोचले. तसेच रुग्णालयात पोहोचत मृतकांच्या व जखमींच्या कुटुंबीयांशी संपर्क करून त्यांना रुग्णालयात बोलावून घेतले. मृतकाचे कुटुंब येताच मृतकांची ओळख पटली. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच बघणाऱ्यांची घटनास्थळी तसेच उपजिल्हा रुग्णालयात भेट झाली होती.