चेकदरूर येथिल तरुणांचा विहीरीत पडून मृत्यू गोंडपीपरी तालुक्यातील चेक दरूर येथील 17 वर्षीय तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना

चेकदरूर येथिल तरुणांचा विहीरीत पडून मृत्यू

गोंडपीपरी तालुक्यातील चेक दरूर येथील 17 वर्षीय तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना

चेकदरूर येथिल तरुणांचा विहीरीत पडून मृत्यू गोंडपीपरी तालुक्यातील चेक दरूर येथील 17 वर्षीय तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- आज दि.4 जानेवारी रोज मंगळवारला चेक दरूर शेत शिवारात दोन वाजताच्या दरम्यान घटना घडली आहे.
म्रुतकाचे नाव
गौरव उर्फ डोनेश्वर गजानन नागापुरे रा.चेक दरूर वय 17 वर्ष असे आहे.
प्राप्त माहिती नुसार गौरव उर्फ डोनेश्वर
बैलाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेला होता.
शेतातील
विहीरीतुन पाणी काढत असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो विहिरीत पडला.
विहिरीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्याला पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.
सदर
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली.
लगेच गोंडपीपरी पोलिसाना माहिती देण्यात आली असता
घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले असून मृतकाचा मृतदेह विहिर बाहेर काढन्यात आला असून उत्तरणीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे पाठविण्यात आला आहे.
पुढील तपास गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली …..
पोलीस करीत आहे.