‘आॅल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन’ संघटनेने घेतली रावसाहेब दानवेंची भेट; ‘हे’ आहे कारण
विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. ९७६८५४५४२२
भोकरदन (जि. जालना) : ‘आॅल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन’ संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्राते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना येथील राहत्या घरी २ जानेवारी रोजी भेट घेतली. तसेच संघटनेने स्टेशन मास्टर्सच्या रखडलेल्या विविध मागण्यांचे निवेदन पत्र दानवे यांना दिले. यावेळी संघटनेचे इतर वरिष्ठ सदस्य देखील उपस्थित होते.
‘आॅल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन’ने स्टेशन मास्टरांच्या प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या नव्या डायरीचे अनावरण दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संघटनेने केंद्रीयमंत्री दानवे यांना गोव्यात होणाऱ्या आगामी ‘नॅशनल लिडरशीप ट्रेनिंग कॅम्प’चे आमंत्रण दिले.
दरम्यान, ‘आॅल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन’ संघटनेने स्टेशन मास्टरांचा रात्रपाळीचा थकीत भत्ता, स्टेशन मास्टरांचे रिक्त पदे अशा विविध मागण्यांचे निवेदन पत्र केंद्रीय मंत्री दानवे यांना दिले. निवेदन पत्र वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री दानवे यांनी प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, असे ‘आॅल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन’ संघटनेचे कुमार कुंदन यांनी सांगितले. दानवे यांना निवदेन पत्र देताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्राते, क्रिष्णाकांत प्रसाद, कुमार कुंदन उपस्थित होते.