मुरमाडी/तुप. जि. प.क्षेत्रात सर्वाधिक 14 उमेदवार

मुरमाडी/तुप. जि. प.क्षेत्रात सर्वाधिक 14 उमेदवार

मुरमाडी/तुप. जि. प.क्षेत्रात सर्वाधिक 14 उमेदवार

मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखनी : तालुक्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठीआरक्षित असलेल्या एकमेव जिल्हा परिषद क्षेत्र २८ मुरमाडी/तुप. येथे छाननी नंतर १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी भाजपा , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष चुन्नीलाल वासनिक यांचेतच चौरंगी लढत होण्याची शक्यता मतदारांत वर्तविण्यात येत आहे. २८ मुरमाडी/ तुप. जिल्हा परिषद क्षेत्रात मिरेगाव , सोनमाळा , भूगाव , मेंढा , विहीरगाव , खूनारी , पळसगाव , कोलारी , झरप , डोंगरगाव , मुरमाडी/तुप. , रामपुरी, नान्होरी, शिवणी ,दिघोरी, कन्हाळगाव, कोलारा, निमगाव इत्यादी १८ गावे समाविष्ट असून मतदार संख्या १५ हजार ९४१ आहे. छाननी नंतर भाजपा चे गजानन(गणेश) निरगुळे , राष्ट्रवादी काँग्रेस चे उमराव आठोळे , काँग्रेस पक्षाचे हेमंत(आकाश) कोरे , बहुजन समाज पक्षाचे प्रमोद मेश्राम , वंचित आघाडी चे सुनील चापले , प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेश पचारे हे राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत. याशिवाय अपक्ष चुन्नीलाल वासनिक, प्रकाश चुटे, दिलीप चापले ,पद्माकर बावनकर, अनिल कुंडे, हर्षवर्धन कोहपरे , रवींद्र(दादू) खोब्रागडे , लोमेश बावनकुळे हे १४ उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष चुन्नीलाल वासनिक यांचेतच चौरंगी लढत होणार आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह निश्चित असल्यामुळे प्रचार सुरू केला असला तरी अपक्ष उमेदवार मात्र चीन्हाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत असल्याच्या मतदारांत चर्चा होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here