ज्ञानविकास रातशाळा सायन (पूर्व) विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी...

ज्ञानविकास रातशाळा सायन (पूर्व) विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी…

ज्ञानविकास रातशाळा सायन (पूर्व) विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी...

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई : – दि. ३ जानेवारी २०२२ रोजी
राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानविकास रात्रशाळा, सायन (पुर्व) तर्फे विद्यार्थी वर्ग तर्फे राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले जयंती सोहळा
प्रिन्सिपल परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रशाळेतील श्रमिक विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वृंद मार्फत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी रात्रशाळेचे शिक्षक कामिनी केंद्रे मॅडम, फडतरे सर, सतिश नागमुडे सर, डि. बी. आरोटे सर आणि मुख्य उपस्थितीत दै. सकाळचे वार्ताहर तांबे यांचे सावित्रीमाई फुले यांचे जीवनकार्य आणि शिक्षणाचे महत्त्व ह्या विषयावर मार्गदर्शन झाले तर जयश्री मोहिते, विनल पराडकर, अंकुश जाधव यांनी काव्य सादर केले आणि जितेंद्र कांबळे यांनी संपूर्ण सोहळ्याचे संयोजन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here