क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती सायन कोळीवाडा तक्षशिला बुध्द विहार येथे साजरी

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मुंबई- भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री , भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या सावित्रीमाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीमाई फुले यांना ओळखले जाते.या सावित्रीमाई फुले यांची जयंती काळ ०३ जानेवारी ला लोकसत्ताक स्टडी सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रम हा भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ तसेच आदर्श सामाजिक प्रतिष्ठान , तक्षशिला महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अँटोप हिल पोलीस स्टेशन चे अधिकारी पी.एस.आय मा.वाघ सर,पी.एस.आय मा.खरावन सर , पोलीस हवालदार मा पाटील साहेब ,मा. संजना भोईर मॅडम सहायक शिक्षिका , उद्योजिका मा.गीता दीक्षित मॅडम डॉ बाबासाहेब अंबेडकर सवर्धन समिती अध्यक्ष मा वत्सला ताई हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

  • ३ जानेवारी ‘हाच खरा शिक्षक दीन’

कार्यक्रमाची सर्वात सावित्रीमाई फुले, महत्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन अभिवादन करण्यात आले तसेच सविधांच्या प्रास्थाविकेचे वाचन करून करण्यात आले अँटोप हिल पोलीस स्टेशन चे अधिकारी पी.एस.आय मा.वाघ सर यांनी सायबर क्राईम विषयी महत्वपूर्ण माहिती दिली गुन्हेगारी कशी घडते ,लोकांना कस फसवल जातं या विषयी इस्तंभुत माहिती दिली.

उद्योजिका मा.गीता दीक्षित मॅडम यांनी महिलांच्या आरोग्याबाबत माहिती दिली मासिक पाळी आणि सनिटरी pad आणि त्यातून खत कस तयार होते याबाबत माहिती देऊन उपस्थितांना उत्तम संबोधित केले.भारतीय लोकसत्ताक संघटनाचे अध्यक्ष मा अमोल कुमार बोधिराज सर यांनी शिक्षण आणि भेदाभेद कसा पाळला जात आहे. एकसमान शिक्षण शासनाने उपलब्ध करून दिले पाहिजे .डॉ.बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती २२/३७ अध्यक्ष मा वत्सला ताई हिरे यांनी शुभेच्छा दिल्या.मा. संजना भोईर मॅडम सहायक शिक्षिका प्रमुख वक्त्या यांनी सावित्रीमाई फुले यांची जयंती हाच खरा शिक्षक दीन या विषयी वकृत्व केलं सावित्रीमाई फुले यांच्या विविध पैलूंवर भाष्य करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा वैशाली कदम मॅडम यांनी केले तसेच मा.अश्विनी पवडमन यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

सदर कार्यक्रमास भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ यांचे कार्यकर्ते मा दीपिका आंग्रे ,मा सनी कांबळे, मा मनिष जाधव मा मंगेश खरात, मा किरण गमरे मा रुपाली खळे, मा पिलाजी कांबळे, मा नितिन सातपुते, मा कमलेश मोहिते मा.श्रेयस जाधव , मा अतुल मोहिते मा अंकिता मोरे, मा सुषमा सावंत,सुषमा कांबळे, मा.नरेश कांबळे, मा.सुबोध सकपाळ,मा योगेश कांबळे मा.सचिन रामाने मा.मिताली गमरे तसेच स्थानिक लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here