मौजा मांडेसर येथे बालिका दिनाच्या आयोजनातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती थाटामाटात संपन्न
स्त्री सशक्तीकरणावर वक्त्यांनी मांडली विविधांगी मते, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना दिली बक्षिसे
भारतीय प्रबोधनकार श्री. सुशील सध्दर्मी ” नालंदा ऑक्रेस्ट्रा गृप द्वारे ” आगाज क्रांतीची ” प्रस्तुती
✍️ राम राऊत ( मोहाडी तालुका ग्रामीण प्रतिनिधी ) 📱मो.नं.7517204987📞
मोहाडी : ( मांडेसर ) दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी मौजा मांडेसर येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती महिला मुक्ती दिन व बालिका दिवस म्हणून महात्मा ज्योतिबा फुले माळी संघटना मांडेसर द्वारे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित वक्त्यांनी स्त्री सशक्तीकरणावर विविधांगी उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. गुलाबजी सव्वालाखे सरपंच , उद्घाटक मा. श्रीकृष्णजी राऊत माझी तं. मुक्ती समिती अध्यक्ष, प्रमुख वक्ते मा. कॉम्रेड वैभव चोपकर (AISF राज्य सचिव महाराष्ट्र राज्य ) कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा. राजकुमार बांगरे (सचिव यु वा. समिती ), मा. डी.एन. बोरकर ( LIC अभिकर्ता ) , मा. भवनभाऊ लिल्हारे (अध्यक्ष शा.व्य.स. मांडेसर ) प्रमुख अतिथी , आयोजक मंडळ, सल्लागार , सदस्य , युवा मंच, यांच्या उपस्थितीत ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजा अर्चन करून, फित कापून , आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कॉम्रेड वैभव चोपकर ( AISF राज्य सचिव महाराष्ट्र राज्य )यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकून महिलांच्या सक्षमीकरणाचे आणि भारतीय लोकशाहीच्या विकासात सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर लोकशाहीत मतदानाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असून मतदानाच्या प्रक्रियेतून लोकशाही पद्धतीला बळकट करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाच्या हक्क बजावण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या सौ. तनुजा सुर्यकिरण सव्वालाखे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मार्गदर्शन करताना ” या दुनिया शाळा , शिकविल्या मुली, पेटविल्या चुली घरोघरी , शिकल्या महिला , खंबीर होऊन उचलला पेन क्रांतीसाठी , अशा शब्दात सावित्रीबाईंचा गौरव केला.
त्याचप्रमाणे मा. श्री. डी.एन. बोरकर प्रमुख मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन करताना सावित्रीबाईंचे ध्येय , समाजसेवा ‘ त्यांनी केलेले कार्य , व त्यांचे उद्दिष्टे काय ? शिक्षण म्हणजे काय ? शिक्षणाचे महत्त्व काय ? शिक्षणाचे फायदे ? शिक्षणामुळे प्रगती कशी होते ? या विषयांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. गुलाबजी सव्वालाखे यांनी सावित्रीबाई चे जीवन चरित्र कसे ? समाजासाठी कसे धडपडत होती ? मुलींना का शिकविले पाहिजे ? या विषयावरून मार्गदर्शन करताना सावित्रीबाईंनी केलेले कार्य विधवा विवाह, अस्पृश्यता निर्मूलन , स्त्रियांना समाजात त्यांचे हक्क मिळवून देणे , स्त्रियांना शिक्षण देणे ‘ असे अनेक प्रथा सावित्रीबाई फुले यांनी दूर केल्या आणि त्यांना या कार्यात यश मिळाले. अशी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
आजच्या सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यात ग्रामपंचायत कार्यालय मांडेसर यांचेकडून अल्पोहार देण्यात आले हे खास आहे. असे अनेक व त्यांनी प्रबोधन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. रोशनजी लिल्हारे , मा. सुर्यकिरण सव्वालाखे , सौ.कामिनाबाई दमाहे, मा. भगतसिंगजी दमाहे , मा. धर्मराज तिवडे , अरविंदजी राऊत , राधेश्यामजी गोटेफोडे , रामचंद्रजी बनकर ‘ अजाबरावजी बावणे , राहुलजी मेश्राम ‘ सौ. मंगलाताई नागपूरे, वासुदेवजी उपरिकर, भावलालजी राऊत , सुधाकरजी मालाधारी, सौ. मालतीताई भसगवळे, घनश्यामजी गोटेफोडे , अजयजी गोटेफोडे , सत्यवान गोटेफोडे, राम राऊत , विनोद राऊत, अमोल उपरिकर , गणेशजी राऊत , अनमोल मेश्राम , रविन्द्र राऊत , अशोक राऊत, सेवक राउत, देवेंन्द्रजी मेश्राम, हरिचंदजी बनकर, कन्हैय्यालाल राऊत , धमेंद्र मेश्राम , अनिल मेश्राम, राजेश राऊत , सुधाकर राऊत, शालीक राऊत , सेवकजी खडसे, सत्यवानजी चामट , सुरेश डहाके, अशोकजी खडसे समस्त मांडेसर , रामपूर ग्रामवासी , आयोजक मंडळ , सल्लागार , सदस्य, युवामंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे मंच संचालन श्याम राऊत, आभार भवनभाऊ लिल्हारे यांनी मानले.
कार्यक्रमात भारतीय प्रबोधनकार सुशिल सध्दर्मी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती निमित्त ” आगाज क्रांतीचा ” ऑर्केस्ट्रा सादर केले हे खास आहे. ह्यावेळी मांडेसर रामपूर ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.