शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे ठप्प पडलेले काम तातळीने पूर्ण करा- अमित बोरकर
आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदनातून केली मागणी
.. 🖋️साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घूस – शहरातील तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आलेले आहे मात्र आता शेवटच्या टप्प्यातील काम रखडल्याने ग्रामीण रुग्णालयाचा लाभ शहरातील नागरिकांना मिळत नसल्याने आम आदमी पक्षा तर्फे माजी शहर अध्यक्ष तथा नवयुवक बौद्ध मंडळाचे अध्यक्ष अमित बोरकर यांच्यातर्फे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून सामान्य जनतेसाठी रुग्णालयाचे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
घुग्घुस क्षेत्रातील सरकारी रुग्णालयाचे काम मागील दोन ते तीन वर्षापासून ठप्प पडून आहे आणि सध्या कुठली सुविधा ( MRI ,CT SCAN, Blood Test,etc ) येथे उपलब्ध नाही त्यामुळे सामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे छोट्या छोट्या आजारासाठी चंद्रपूरला धाव घ्यावं लागत आहे तसाच या क्षेत्रातील रुग्णवाहिका (Ambulance) सर्विस सुद्धा पूर्ण पणे निष्क्रिय आहे. बरेचदा सोय सुविधा नसल्यामुळे आजारी व्यक्तीचा जीव सुद्धा गेला आहे यापुढे अशी घटना घडली नाही पाहिजे म्हणून लवकरात लवकर सरकारी रुग्णालयाच काम पूर्ण करून सामान्य जनतेसाठी सरकारी हॉस्पिटल खुले करण्यात यावे अशी मागणी आमदारांना करण्यात आली.