भंडारा येथे वार्षिक उत्सव ‘अॅन्युअल लोटस फेस्ट 2024-25

138
भंडारा येथे वार्षिक उत्सव ‘अॅन्युअल लोटस फेस्ट 2024-25

भंडारा येथे वार्षिक उत्सव ‘अॅन्युअल लोटस फेस्ट 2024-25

भंडारा येथे वार्षिक उत्सव ‘अॅन्युअल लोटस फेस्ट 2024-25

लोटस पब्लिक स्कूल, भंडारा येथे ‘अॅन्युअल लोटस फेस्ट’
लोटस पब्लिक स्कूल,

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो 9860020016

भंडारा :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अश्विनी नरेन्द्र भोंडेकर उपस्थित होत्या.
वैशाली नगर येथील लोटस पब्लिक स्कुल च्या वार्षिक उत्सव प्रसंगी बोलताना डॉ. भोंडेकर यांनी महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीवाई फूले यांच्या जयंती दिनी वार्षिक उत्सव आयोजित केल्यावद्दल शाळेचे कौतूक केले. लहान मूलांची काळजी, सुरक्षा, त्यांचे आरोग्य, स्वच्छता यांविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करून शाळा प्रशासन व त्यांच्या परिश्रमाची प्रशंसा केली व शाळेच्या पूढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
मंचावर उपस्थित श्री महादेवजी मेश्राम यांनी शाळेचे उपक्रम व शिक्षकांची मेहनत यांची भरभरून प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक पर भाषणातून प्रिंसीपल अश्विनी भैसारे यांनी शाळेतील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व आजच्या दिवसाचे औचित्य यावर भाष्य करून वार्षिक उत्सवाची तयारी व शिक्षकांच्या परिश्रमाची प्रशंसा केली.
अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना संचालक प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे यांनी शाळेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, ध्येय धोरणे, उद्दीष्टे व तसेच आशुभाऊ वंजारी व देवेन्द्रजी बडोले यांच्या मदतीने राबवायच्या पूढील योजना यावर भाष्य केले. नवनवीन शैक्षणिक कल्पना, विविध कौशल्ये, उपक्रमशीलता इ. गोष्टीमध्ये शाळेचे वेगळेपण विषद करून सांगितले. तसेच लहान मूलांच्या कोऱ्या मेंदूवर चांगल्या व सत्य गोष्टींचे अनुभव देवून त्यांना द्वेष पसरविणार्याश गोष्टींपासून दूर ठेवण्याचे आवाहन कोले.
या प्रसंगी पालकांमधून पुजा शिवराम सोनवाने यांनी शाळा प्रशासन व त्यांचे प्रयत्न यांची प्रशंसा केली. मंचावर श्री देवेन्द्रजी बडोले, श्री रमेशजी जांगडे, श्री मन्सारामजी दहिवले, सौ. शालीनी नागदेवे, सौ. ईश्वरकर मॅडम इ. मान्यवर उपस्थित होते.

शाळेत राबविण्यात आलेल्या विविध क्रिडा व सांस्कृतिक उपक्रमांतील विजेत्यांना अतिथींच्या हस्ते मेडल, ट्रॉफी व सर्टीफीकेट देवून त्यांचा गौरव करण्यात आला. लहान मूलांचे अप्रतीम नृत्य सादरीकरण, एकल कला सादरीकरण, त्यांची वेशभूषा यांचा उपस्थितांनी भरपूर आनंद घेतला. या प्रसंगी पालकांनी सुद्धा आपल्या मूलांसोचत नृत्य सादरीकरण केले. पालकांसाठी म्युजिकल चेअर व कपल गेम सुद्धा आयोजित करण्यात आले होते. या संपूर्ण आयोजनासाठी संचालक प्रा. डॉ. भैसारे, प्रिंसीपल सौ. भैसारे, संगिता पूरी मिस, छाया संग्रामे मिस, रुचिता आगरे मिस, नंदिनी खोब्रागडे मिस, रेखा नागोलकर दीदी यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये संस्था सदस्य श्री आशुभाऊ वंजारी व श्री देवेन्द्रजी बडोले व पालक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
एकंदरीत शाळेचे हे वार्षिक उत्सव, त्यातील प्रभावीपणा, कार्यक्रमांची निवड, विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण, शाळेची मेहनत, पालकांचा स्वयंस्फूर्त सहभाग इ. गोष्टी परिसरात चर्चेचा विषय ठरले.