बजेट इफेक्ट! शेअर बाजार उघडताच ‘धडामधूम’

53

मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात सुरू झालेली पडझड सोमवारीही थांबली नाही. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स ४५० अंकांनी कोसळला. तसंच सुरुवातीच्या सत्रातच निफ्टीनंही कच खाल्ली. निफ्टी १०,६०० अंकांवर पोहोचला. सेन्सेक्स आणि निफ्टीचे व्यवहार १.२५ टक्क्यांच्या घसरणीनं सुरू आहेत.

सेन्सेक्स आणि निफ्टीप्रमाणंच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. दरम्यान, मोदी सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराची सुरू झालेली घसरण अद्याप कायम आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स ५८.३६ अंकांनी घसरून ३५९०६ अंक, तर निफ्टी १० अंकांनी घसरून ११०१६ वर स्थिरावला होता.