जगप्रसिध्द लोणार सरोवरास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देऊन पाहणी करणार.

बुलडाणा:- जगप्रसिध्द लोणार सरोवरास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देऊन पाहणी करणार आहेत. सव्वादोन तासांच्या या लोणार भेटीनंतर मुख्यमंत्री या लोणार भेटीनंतर विकास आराखड्यातील रखडलेल्या निधीची बजेटमध्ये तरतूद करतील तसेच लोणार विकास प्राधिकरणाचीही घोषणा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावरील खगोल-भूगोल संशोधकांचे व पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेला लोणार सरोवर परिसर अद्यापही विकासापासून कोसो दूर आहे. येथे दूरवरुन येणाऱ्या संशोधक, पर्यटकांसाठी किमान पायाभूत सुविधा साधनेही उपलब्ध नसल्याने त्यांची निराशा होते. ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवराला तीन महिन्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ साईटचा दर्जा मिळाला आहे.