The struggle ended with the death of the 13-year-old girl. Hustle everywhere
The struggle ended with the death of the 13-year-old girl. Hustle everywhere

अवघ्या 13 वर्षीय त्या ‘बालिकावधू’ ची मृत्युशी झुंज संपली. सर्वत्र हळहळ

 The struggle ended with the death of the 13-year-old girl. Hustle everywhere

नाशिक :- अवघ्या 13 वर्षी मुलीच लग्न झाल्याची घटना महाराष्ट्रात झाल्याची घटना लॉकडाउन मध्ये घडली. आता त्याच 13 वर्षीय नाबालीग बालीका वधू मयत झाल्याने संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथे मे 2020 मध्ये म्हणजे अगदी कडेकोट लॉकडाउन असताना हा बालविवाह पार पडला होता. विवाहाच्या साडेसहा महिन्यानंतर मुलीच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे बालवधूसह तिचे सासरचे करंजवणला पोहोचले. 24 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घरातील गरम पाण्याने भरलेला ड्रम सांडला आणि त्यात बालवधूसह तिची नणंद भाजली. पाठीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना दिंडोरी आणि पुढे आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मुलीच्या आईसह सासरच्यांमध्ये वाद उभे राहिले आणि त्यातूनच बालविवाहाचा प्रकार आला. पुढे याच वादामुळे बालवधूच्या आईने मुलीला कधी दिंडोरी, तर कधी नाशिक येथे उपचार दिले. अनेक  उपाय करण्यात आले. मात्र, तिचे दुखणे वाढतच गेले आणि तिचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

माहेरीच एका अपघातात भाजलेल्या बालवधूवर 24 नोव्हेंबरपासून उपचार सुरू होते. दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिची मृत्युशी झुंज अखेर संपली. बालविवाहाचा गुन्हा नोंद असलेल्या पोलिस ठाण्यातच आता मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलीच्या आईसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण संजय बिडवे, संजय बिडवे, संगीता बिडवे सर्व रा. खंबाळेवाडी, घोटी, ता. इगतपुरी, तसेच बालवधूची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाहप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल असून, मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कलम 304 (a) नुसार संबंधित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत म्हणाले, ‘या प्रकरणी सासरच्या तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले; तसेच त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. मुलीच्या आईला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here