पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या, केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी निषेध आंदोलन.

50

पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या, केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी निषेध आंदोलन.

कळमेश्वर तहसील कार्यालया समोर शिवसेनेन केला निषेध.

युवराज मेश्राम प्रतिनिधी

कळमेश्वर:- केंद्र सरकारने वारंवार केलेल्या इंधन व गॅस दरवाढीचा व महागाईचा निषेध म्हणून  शिवसेनेन तहसील कार्यालया समोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत जनतेच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.  डॉ. घनश्याम मकासरे, प्रशांत इखार यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी इखार म्हणाले, पेट्रोल 94 रुपये लिटर तर डिझेल 83 रुपये झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर वाढविल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका बसला आहे.

withdraw-petrol-and-diesel-price-hike-shiv-senas-protest-against-the-central-government

तेव्हा केंद्र सरकरने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत. कोरोना संक्रमणामुळे अनेकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. शेतकरी या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे चिंतेत आहे. त्यात आंब्या बहाराच्या संत्र्याला भाव नव्हते. मृग बहाराची संत्री खुप कमी प्रमाणात आहे. यावर्षी शेती ला लावलेले पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. अश्यावेळी केंद्रसरकारने नागरिकांना दिलासा देण्याएवजी पेट्रोल – डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्यांची लुट केली आहे. रोजगार नसल्याने युवक हतबल झाला आहे. छोटे – मोठे व्यवसाय ढप्प अवस्थेत आहे. अशावेळी डिझेल – पेट्रोलची दरवाढ करून आर्थिक फटका बसला आहे. यावेळी प्रामुख्याने शिवसेना विधानसभा संघटक डॉ. घनश्याम मकासरे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत ईखार सह मधुकर दळवी प्रदीप गोतमारे, विजय आतकरी, युवराज हणवते ,राजू धार्मिक, श्री ठाकरे , राहुल चूनारकर ,बाळू जाचक ,विजय वाघधरे ,सचिन रघुवंशी, विलास बारमासे, अविनाश पाटील, महिला जिल्हाप्रमुख वंदनाताई लोणकर, सुजाता निमजे, बाबारावजी गोतमारे, थांसिंग पटले, किशोर तूरकर असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.