विकासाच्या दृष्टिने सावनेर शहरात काहीच कमी राहणार नाही-मंत्री सुनील केदार

विकासाच्या दृष्टिने सावनेर शहरात काहीच कमी राहणार नाही-मंत्री सुनील केदार

विकासाच्या दृष्टिने सावनेर शहरात काहीच कमी राहणार नाही-मंत्री सुनील केदार

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नंबर-९८२२७२४१३६

सावनेर-०४फरवरी२०२२
शहरात उभारण्यात येत असलेले १० खाटाचे ट्रामा सेंटर हे वैद्यकीय शिक्षण विभागाचे असून यासाठी 37 पदे भरण्यात आली आहे.तीन मजली असणाऱ्या या इमारतीमध्ये वरील दोन मजले महिलांसाठी राखीव राहणार आहे.विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलण्यासाठी मला काय करायचे आहे याची माहिती द्या,फीडबॅक द्या.मी विकासाच्या दृष्टीकोनाने काहीच कमी पडू देणार नाही.मी सरकारमध्ये मंत्री आहे विकास कामे आज नाही तर कधी करायची?असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
ते सावनेर येथे ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.
यावेळी मंचावर मा.उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,डॉ. सुधिर गुप्ता (अधिष्ठातानागपूर वैद्यकीय महाविद्यालय) , सावनेर ग्रामीण रूग्णालय सहयोगी प्राध्यापक डॉ. मंजुषा ढोबळे,डॉ.संदीप गुजर,डॉ.अमित बाहेती,डॉ. शिवम पुण्यानी,पवन जयस्वाल (नगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष),गोपाल घटे (माजी उपाध्यक्ष न. प. सावनेर),नागपूर जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे,सावनेर पं.स.सदस्य अरुणाताई शिंदे,डॉ. उदय नारलावार,डॉ.दीपक सेलोकर,डॉ.फैजल मोहम्‍मद,डॉ. अशोक जयस्वाल,डॉ.संगीता जैन,डॉ.विजय धोटे,डॉ.अशोक घटे,डॉ. दाते,अंँड.श्रीकांत पांडे,मा.चंद्रशेखर सालोडकर (सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता),मा.श्रीराम कङस्कर,माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
१०.८५ कोटीच्या सोहळ्या सह अनेक विकासाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच शासकीय रुग्णालयात ग्रीन जिम्सचे उद्घाटन,विश्रामगृह,क्रिडा संकुलन,प्रभागांमधील सिमेंट रोडच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सावनेर येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालयास मंजुरी मिळवून दिल्याबद्दल सावनेर वकील संघा तर्फे मंत्री सुनील केदार यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here