पारडी ठवरे येथे नवीन विज्ञान प्रयोगशाळा वर्गखोली बांधकाम •जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते भुमीपुजन संपन्न

49

पारडी ठवरे येथे नवीन विज्ञान प्रयोगशाळा वर्गखोली बांधकाम
•जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते भुमीपुजन संपन्न

पारडी ठवरे येथे नवीन विज्ञान प्रयोगशाळा वर्गखोली बांधकाम •जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते भुमीपुजन संपन्न

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड- नागभीड तालुक्यातील पारडी- मिंडाळा- बाळापुर क्षेत्रातील पारडी ठवरे येथील उच्च प्राथमिक जि.प.शाळेतील नवीन विज्ञान प्रयोगशाळा वर्गखोली बांधकामाचे भुमीपुजन या क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पं.स.सदस्य संतोष रडके यांची विशेष उपस्थिती होती. दोन वर्षाआधी येथे संपन्न झालेल्या बीटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी या विज्ञान वर्गखोलीबाबत दिलेल्या शब्दाची वचनपुर्तता होत असल्याबद्दल संजय गजपुरे यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.
पारडी ठवरे येथे आतापर्यंत आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती व नुतनीकरण , खनिज निधीतून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीडी वर्क व राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याचे सौंदर्यीकरण , समाजकल्याण निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसराचे सौंदर्यीकरण , जिल्हा निधीतून सिमेंट रस्ता व नाली बांधकाम ,ओपन जिम साहित्य , यांसह इतर कामांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी संजय गजपुरे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.
यासोबतच जि.प.शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी जि.प.च्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून उपक्रमशील शाळा म्हणून एक लक्ष व पाच हजार रुपयांच्या विशेष निधी ची तरतुद संजय गजपुरे यांनी करून दिली होती. यातून शालेय व्यवस्थापन समिती मार्फत संगणक तथा विविध शालेय उपक्रम व वाचनालयाला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. शैक्षणिक व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून शाळेसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देणारे उपक्रमशील व विकासाभिमुख जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे विशेष आभार या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गोपाल मस्के यांनी मानले.
या भुमीपुजन प्रसंगी पं.स.सदस्य व तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके , पारडी ठवरे चे सरपंच दिलीप दोनाडे , उपसरपंच नंदुभाऊ खोब्रागडे , ग्रामसचिव रतीराम चौधरी , ग्रा.पं.सदस्य नितेश शेन्डे, अमोल सारये, सौ.दर्शनाताई गजभिये, सौ.अनिताताई ठवरे, सौ.सुनिताताई ठवरे, सौ.सुरेखाताई गजभे, सौ.गिता रडके , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाल मस्के , मुख्याध्यापक मालचंद खंडाळे सर , सुनिल हटवार सर, गौतम राऊत सर, धनराज पडोळे सर, दयाराम रामटेके सर, सुबोध हजारे सर , अशोक शेंडे सर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक हरीदास ब्राह्मणकर ,देवीदास बागडे,स्वप्नील ठवरे,अंकित खांडपुरे,गजानन भोयर उपस्थित होते