शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडिबीटीवर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करा

49

शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडिबीटीवर

15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करा

शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडिबीटीवर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा : सन 2021-22 या वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी या योजनेचे अर्ज भरण्याकरिता 14 डिसेंबर 2021 पासून महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत खुपच कमी अर्ज भरण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

महाविद्यालयाने आपल्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने भरुन घेण्याचे नियोजन करावे. एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी घ्यावी, असे समाज कल्याण विभागाने कळविले आहे.