…अन मोहन पंचभाईंनी देशभक्ती गीतावर ठेका लावला
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/पवनी:-नेतेगिरी करणारे अनेक माणसं असतात मात्र राजकीय क्षेत्रात राहून सामाजिकता जोपासणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई निराळेच! प्रसंग होता देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचा… कार्यक्रम सुरू असताना ‘ए वतन..ए वतन…’ हे शब्द कानावर पडताच मोहन पंचभाई यांनी गीतांवर ठेका लावून देशभक्तीचा परिचय दिला. यावेळी उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पवनी येथील गांधी चौकात देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती विकासभाऊ राऊत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार जगदीश गायकवाड, डॉ. प्रकाश देशकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे, धर्मेंद्र नंदरधने, भगवान नवघरे, प्रकाश पचारे, महेंद्र रंगारी, माधुरी तलमले, मनोहरराव उर्कुडकर, कमलाकर रायपूरकर, कोरंभी गावचे उपसरपंच चंदु कावळे, राजू भुरे, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे सुलतानभाई, शशिकांत भोगे, अनिल बावनकर, मनोहर मेश्राम, भाऊराव वैद्य इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान देशभक्ती गीतांची धुमाळी सुरू असताना ‘मेरे देश प्रेमियो आपास मे प्रेम करो देश प्रेमियो’ यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी मोहन पंचभाई यांनी लावलेला ठेका देशप्रेमाची भावना जागृत करीत होता. नेत्यांसोबत कार्यकर्त्यांनीही गाण्याच्या तालावर ठेका लावून रंगत आणली. पद, प्रतिष्ठा सोबत पंचभाईंनी जोपासलेली देशभक्ती शहरात चर्चेचा विषय ठरली. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी व ते टिकवून ठेवण्यासाठी सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणार्या शूरवीरांच्या आठवणी “ए मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी” हे गीत गाताना व्यक्त होत होत्या. कलावंतांनी “सुनो गौरसे दुनिया वालो… बुरी नजर ना हम पे डालो…चाहे जितना जोर लगाओ…सबसेआगे होंगे हिंदुस्तानी…” हे गीत सादर करताच संगीताच्या तालावर ठेका घेऊन मोहन पंचभाई थिरकले. प्रामाणिक व कर्तुत्ववान व्यक्तिमत्व समजल्या जाणाऱ्या नेत्याची देशभक्तीची लय देखील याप्रसंगी रसिकांनी अनुभवली!
सदर कार्यक्रम एन. एस. यु. आय. व युवक काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गायधने सर यांनी तर आभार प्रदर्शन एन एस वाय चे अध्यक्ष महेश नान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश नान्हे, अनिकेत गभने, चेतन हेडाऊ, अक्षत नंदरधने, तुषार भोगे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.