जिल्हास्तरीय युवा संमेलन उत्साहात संपन्न
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मंडळाचे मान असर फाउंडेशनला
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा-: नेहरू युवा केंद्र भंडारा तर्फे दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी ढोलसर येथे जिल्हास्तरीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या यशस्वितेकरिता एकता नवयुवक बहुद्देशीय युवा मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संमेलनामध्ये विविध विषयावरती तज्ज्ञ अतिथीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत सादर करून करण्यात आली व प्रमुख पाहुण्यांचे मान चिन्ह पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. नॅशनल ट्रेनर ने श्री. पाखमोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी नॅशनल ट्रेनर भीमराव रंगारी, नंदलाल गंगापरी मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडीया, रिजर्व बॅंकेचे CFL चे प्रमुख सारिका दरवडे, पं. स. सदस्य मंगेश राऊत, जि.प. सदस्य रसिकाताई रंगारी, पं.स. सदस्य अमृताताई ठाकरे, माजी सरपंच जगनरावजी हुकरे यांचे स्वागत करण्यात आले.
पाहुण्यांच्या हस्ते टिकेश्वर वाघमारे यांची मिल्ट्रीमध्ये निवड झाल्याबद्दल शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मंडळाचा पुरस्कार असर फाउंडेशन यांना देण्यात आला. असर फाउंडेशनद्वारे समाज प्रबोधनावर पथनाट्य, नृत्य सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे ढोलसर येथील युवांनी उत्कृष्ट नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. माजी राष्ट्रीय स्वयंसेवक व अध्यक्ष एकता नवयुवक बहुद्देशीय युवा मंडळ ढोलसर श्री. वाढई यांचे कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मानचिन्ह व शाल देऊन जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशिष वाढई यांनी केले.