लातुर जिल्हातील निलंगा तालुक्यात मंदिरात नारळ फोडल्यानं दलितांवर टाकला बहिष्कार.
लातुर जिल्हातील निलंगा तालुक्यात मंदिरात नारळ फोडल्यानं दलितांवर टाकला बहिष्कार.

लातुर जिल्हातील निलंगा तालुक्यात मंदिरात नारळ फोडल्यानं दलितांवर टाकला बहिष्कार.

महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना.
मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने तरुणाच्या कुटूंबियावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला.

लातुर जिल्हातील निलंगा तालुक्यात मंदिरात नारळ फोडल्यानं दलितांवर टाकला बहिष्कार.
लातुर जिल्हातील निलंगा तालुक्यात मंदिरात नारळ फोडल्यानं दलितांवर टाकला बहिष्कार.

✒प्रशांत जगताप कार्य. संपादक✒
📱976644534
लातूर :- जिल्हातील नीलंगा तालुक्यात शिवाजी, शाहू, फुले आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी खळबळजनक बातमी समोर आली आहे. निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नारळ फोडल्याने गावतील जातिवादी सैतानी समाजाने या कुटूंबावर बहिष्कार टाकला निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात ही मानवतेला कलंकित करणारी घटना घडली आहे. तब्बल तीन दिवस या कुटूंबाला गावकऱ्यांनी वाळीत टाकले होते. त्यामूळे संपुर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. बहिष्कार टाकल्यानंतर सदरील कुटूंबातील सदस्यांना साधे पीठही दळून दिले नाही त्यामूळे त्यांना अन्न पाण्या वाचुन आपले जिवन जगाव लागल आहे.

या परिवारावर बहिस्कार टाकुन अन्न पाण्याच्या मुलभुत हक्कावर गदा आनणा-या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल झाला त्यानंतर पोलिस विभागाला जाग आली आणि पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर हे बहिष्कार प्रकरण मिटले आहे. पण एका समाजातील तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानेच हा प्रकार घडला आहे. अद्याप याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही पण या प्रकरामुळे संताप व्यक्त होत आहे.

आज पण महाराष्ट्रात धार्मीक मानसिकता किती खोल वर रुजली असल्याचे चित्र या घटने वरुन समोर येत आहे. गावातील अंधमय गुलामीच वास्तव हे वेगळेच आहे. ताडमुगळी हे निलंगा तालुक्यातील गाव असून येथे एका तरुणाने मंदिरात प्रवेश करुन नारळ फोडला एवढाच काय तो त्याचा रोल. मात्र, त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या कुटूंबावरच बहिष्कार टाकला. त्याच्या कुटूंबीयांना कोणती वस्तू गावात मिळू नये शिवाय हे कुटूंब बहिष्कृत आहे याची माहिती सर्वांना व्हावी याकरिता थेट दवंडी देण्यात आली. त्यामुळे तीन दिवस किराणा माल, गिरणीतून दळणही या कुटूंबियांना मिळालेले नाही.

समाज माध्यमावर वीडियो व्हायरल ?

बहिष्कृत परिवाराची एक महिला ही पिठ दळून आणण्यासाठी गेली असता चक्क पिठ दळुन देण्यास नकार दिला आहे. शिवाय घरात पीठ नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचे ती महिला सांगत असतानाही तिला विरोध केला जात आहे. आज दळण दिले तर गावातील लोक काय म्हणतील? असे म्हणत तिला टाळले जात होते. कारण मदत केली तर 50 हजाराचा दंड असा फतवाच काढला होता. त्यामुळे कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली होती. अखेर प्रशासनाच्या मध्यस्तीने हे प्रकरण मिटले आहे. मात्र, पुरोगामी महाराष्ट्र कुठंय? हा प्रश्न कायम राहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here