जोगेश्वरीत भूमी वैष्णवी प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
पूनम पाटगावे
जोगेश्वरी प्रतिनिधी
जोगेश्वरी :- जोगेश्वरी पूर्व येथील सर्वोदय नगर येथे भूमी वैष्णवी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री महेश गवाणकर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर रविवार दि. ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी, सर्वोदय नगर नाका येथे आयोजित करण्यात आले होते. या संस्थेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या शिबिरात एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. स्थानिक आमदार श्री रवींद्र वायकर, शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर आणि मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशांसापत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. श्री बाळासाहेब ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले होते तसेच डॉ दीपक देसाई यांनी विशेष सहकार्य केले. आमदार श्री रवींद्र वायकर यांनी या शिबिराला संबोधताना महेश गवाणकर यांच्या आतापर्यंतच्या केलेल्या कार्याचा उल्लेख करून गौरवोद्गार काढून रक्तदात्यांचे आभार मानले.
यावेळी डॉ दिपक देसाई, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, रवींद्र साळवी, माजी नगरसेवक अनंत नर, उपविभाग समन्वयक महेश गवाणकर, शाखाप्रमुख सुभाष मांजरेकर, काँग्रेसच्या पदाधिकारी व समाजसेविका सुरक्षा घोसाळकर, स्वप्नील सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.