जोगेश्वरीत बालविकास विद्या मंदिरात आजी-आजोबा कृतज्ञता सोहळा संपन्न
पूनम पाटगावे
जोगेश्वरी प्रतिनिधी
जोगेश्वरी :- हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना आजी आजोबा दुर्मिळ झाले आहेत. आजी-आजोबांबद्दल मुलांमध्ये आदर निर्माण व्हावा. म्हणून आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संचालित बालविकास विद्या मंदिर ,जोगेश्वरी (पूर्व) शाळेच्या प्राथमिक विभागात आजी-आजोबा कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला .
या सोहळ्यास इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना निमंत्रित केले गेले. त्यांच्या नातवंडांनी कृतज्ञतापूर्वक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . वर्षभरातील शैक्षणिक गुणवत्तेवर तसेच स्पर्धांवर आधारित स्मृती पारितोषिकांचे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या आशाताई परब व आजी-आजोबा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले .
संस्थेचे कार्याध्यक्ष मोतीराम विश्वासराव यांनी विद्यार्थ्यांना क्रीडागणवेशाचे वाटप केले. संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षिकांना बक्षिस देऊन सन्मानित केले. कार्यक्रमास संस्थेचे उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कुलचे चेअरमन सहदेव सावंत, उपकार्याध्यक्ष जनार्दन विश्वासराव, कार्यकारणी सदस्य प्रकाश सावंत, संतोष घाग, सुधाकर सावंत, पर्यवेक्षक जगदीश सूर्यवंशी, मुख्याध्यापिका मनाली परब, डिंपल दुसाणे, शबनम हुल्लर यांनी शुभेच्छा दिल्या. आजोबा विलास अडसुळे व तुकाराम खवणेकर यांनी स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करणारे मनोगत व्यक्त केले. वार्षिक अहवाल वाचन शिक्षिका नेत्रा दळवी तसेच सूत्रसंचालन सुषमा सावंत व अर्चना जाधव यांनी केले . आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .