“प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना” शिबीराच्या माध्यमातून भगवाधारी प्रतिष्ठान संस्थेचे सामाजिक कार्य.

61
"प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना" शिबीराच्या माध्यमातून भगवाधारी प्रतिष्ठान संस्थेचे सामाजिक कार्य.

“प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना” शिबीराच्या माध्यमातून
भगवाधारी प्रतिष्ठान संस्थेचे सामाजिक कार्य.

"प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना" शिबीराच्या माध्यमातून भगवाधारी प्रतिष्ठान संस्थेचे सामाजिक कार्य.

उल्हास पुराडकर, पनवेल तालुका प्रतिनिधी.
७०२८०९८६४२

पनवेल :- दिनांक ४.०२.२०२४ रोजी; घाटकोपर, मुंबई या ठिकाणी भगवाधारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत “प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना” शिबीर भरवण्यात आली होती. भगवाधारी प्रतिष्ठान चे संचालक, अध्यक्ष श्री. राजेश नायर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ह्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव श्री. अंकुश पार्टे साहेब, घाटकोपर अध्यक्ष श्री. निर्वूत उतेकर साहेब आणि सह कार्यकारिणी मंडळी उपस्थित होती. या शिबीरामध्ये स्थानिक लोकांनी प्रचंड संख्येने उपस्थिती दर्शवुन प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेत आपल्या कुटुंबासह नाव नोंदविले.

भगवाधारी प्रतिष्ठान संस्था ही सामान्य माणसांसाठी कार्यरत आहे. कठिण परिस्थितीत व्यक्ती कलंक किंवा भीतीमुळे मदत घेण्यास संकोच करु शकतो, अशावेळी प्रत्येकांपर्यंत मदत पोहचवून त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये:
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ही सरकार-अनुदानीत आरोग्य सेवा कार्यक्रम आहे जी आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना आरोग्य संरक्षण प्रदान करते. हा कार्यक्रम सप्टेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आला आणि ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे.

PMJAY पात्र कुटुंबांसाठी दुय्यम आणि तृतीयक काळजीसाठी प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतची तरतूद करते. ही सहाय्य डेकेअर प्रक्रियेसाठी उपलब्ध आहे आणि अगदी आधीच अस्तित्वात असलेल्या परिस्थितींना लागू होते.