चारिका फाऊंडेशच्यावतीने महामाता रमाई जयंतीदिनी विद्यार्थी व महिलांसाठी विशेष सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

61

ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी

नाशिक :- स्त्री शिक्षणाच्या प्रेरणास्रोत सावित्रीमाई फुले,स्वराज्यप्रेरिका माँ साहेब जिजाऊ भोसले व थोर समाज सुधारक महामाता रमाबाई आंबेडकर या तिन्ही महामातांच्या संयुक्त जयंती निमित्ताने चारिका फाऊंडेशनच्या वतीने येत्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मायको हॉल,छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ,सिंहस्थनगर येथे विद्यार्थी व महिलांसाठी विशेष सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत यावेळेत करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लताताई गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून जनतेच्या प्रबोधनासाठी दिग्दर्शक नाटककार रोहित पगारे प्रस्तुत रमाई यांच्या जिवनावर विशेष नाटिका देखील सादर होणार आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेकडून घेण्यात आलेल्या निबंध,भाषण,रांगोळी,चित्रकला,समूहगीत गायन,वेषभूषा या एकूण सहा स्पर्धामध्ये स्पर्धेत बक्षीस पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते सन्माचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात येणार आहे .
सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ.पल्लवी विशाल जाधव, डॉ.सोनाली पंकज सरदार , डॉ.अर्चना विलास लोखंडे, कालिंदा कुंडलिक अंभोरे, विमल वामन बोढारे आदी निवडक कर्तृत्वान महिलांना २०२४ या वर्षाचा समाजरत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विद्यार्थी,पालक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी केले आहे.