ऋनमोचन येथील भव्य शेतकरी मेळावा संपन्न व्यासपीठावर नितीन कदम यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत व्यवस्थेला डिवचले..!

ऋनमोचन येथील भव्य शेतकरी मेळावा संपन्न

व्यासपीठावर नितीन कदम यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत व्यवस्थेला डिवचले..!

ऋनमोचन येथील भव्य शेतकरी मेळावा संपन्न व्यासपीठावर नितीन कदम यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत व्यवस्थेला डिवचले..!

✒️ देवेंद्र भगत ✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
📱8275348920

अमरावती : दि.05.02.2024 पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, अमरावती व पं. स. भातकुली यांचे संयुक्त विद्यमाने ‘भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळावा’ काल भातकुली येथील श्री क्षेत्र ऋनमोचन येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शेतकरी वर्गाचा गुणवत्तापुर्ण विकास व आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीच्या विविध बहुरंगी प्रदर्षणी विशेष आकर्षण ठरली.शेतीला लागणारे नावीन्यपूर्ण उपकरणे, कृषीविषयक पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना त्यासोबतच शेती व्यवसायाला पूरक असे जोडउद्योगाची माहिती यावेळी सदर कार्यक्रमात देण्यात आली.
यावेळी नितीन कदम यांनी प्रमुख उपस्थिती लावत शेतकरी – शेतमजूर यांच्या समस्या आपल्या मनोगताव्दारे व्यक्त केले. शासस्तरावरून शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही निकाली लागत नसल्याची खंत त्यानी यावेळी व्यक्त केली.
हजारो वर्षांपासून पशुसंवर्धन व्यवसाय शेती व्यवसायाला पूरक म्हणून केला जातो. भारतातील शेतकऱ्यांसाठी पूर्वीपासूनच हे एक उपजीविकेचे साधन राहिले आहे, आज मात्र हे एक स्वतंत्र उद्योगक्षेत्र म्हणून ओळखले जाते. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संधी या कार्यक्षेत्रात निर्माण झाल्या आहेत, मात्र त्यासाठी योग्य प्रशिक्षणाची आणि पुरेशा अनुभवाची गरज आहे असे प्रतिपादन नितीन कदम यांनी आपल्या मनोगताव्दारे सादर केले.
व्यासपीठावर शेतकऱ्यांच्या समस्या थेट विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासमोर मांडण्याची कदाचित विदर्भातील ही पहिलीच वेळ..!
सदर कार्यक्रमाअंतर्गत नितीन कदम यांनी दिव्यागं बांधवाला नवतंत्रज्ञानयुक्त सायकल प्रदान करतं सर्वांची मने जिंकली.त्याचप्रमाणे नितीन कदम यांनी आपल्या सामाजिक सेवा कारकिर्दीतील परंपरा अविरत चालवत दिव्यांग बांधवांना स्वयंचलित नावतंत्रज्ञाणयुक्त सायकलींचे वितरण करण्यात आले. महूर्त कुठलाही असो आपल्या सामाजिक जबाबदारी व कर्तव्याचे धनी नितीन कदम हे नेहमीचं कार्यतत्पर असतात हे विशेष..!
आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद, पंचायत समिती भातकुली, संकल्प शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here