विधवा प्रथा बंद करण्यात यावी याचा ठराव एक मतांनी मंजूर; अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान आबासाहेब पवार (अध्यक्ष),

39
विधवा प्रथा बंद करण्यात यावी याचा ठराव एक मतांनी मंजूर; अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान आबासाहेब पवार (अध्यक्ष),

विधवा प्रथा बंद करण्यात यावी याचा ठराव एक मतांनी मंजूर; अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान आबासाहेब पवार (अध्यक्ष),

विधवा प्रथा बंद करण्यात यावी याचा ठराव एक मतांनी मंजूर; अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान आबासाहेब पवार (अध्यक्ष),

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

media varta news award 2025

कर्जत;-अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान रजि. ठाणेया. सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दि. ०४ फरवरी २०२४ रोजी कर्जत जवळील सदानंद रिसॉर्ट येथे घेण्यात आले. मुंबई सह ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते. महिला मध्यवर्तीय विभाग आणि रायगड जिल्ह्यातील महिला विभाग कार्यकर्त्याची हि ऊपस्थिती होती. सर्व प्रथम प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून दीप प्रज्वलन करण्यात आले, अनुक्रमे स्वामी केतेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आणि जीजाऊंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्री. गणेश वंदन करून. बुरूड समाजातिल दिवंगत विभूतींना श्रद्धांजली अर्पण केली आणि बुरूड समाज “प्रतिज्ञा” घेतली व तिचे सामुदायिक वाचन करण्यात आले. प्रस्थावनेत महासचिव प्रकाश माने यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्याना संस्थेच्या कार्या संबंधातील आणि ध्येय उद्दिष्ट धोरणातील बारकावे विस्त्रुत करून सांगितले. पाच नियम समाज सेवे साठीचे सांगण्यात आले त्याचे सखोल मार्गदर्शन संपूर्ण कार्य कारिणीसदस्य यांचे वतीनेच श्री प्रकाश माने यांनी केले.

ह्यात एक महत्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला कि विधवा प्रथा बंद करण्यात यावी यावर मार्गदर्शन करणारे असे बोलले कि विधवा प्रथा तळा तालुक्यात सर्व प्रथम बंद करण्यात आली आहे व त्याची अंमलबजावणी हि चालू आहे. एकंदरीच पाहता पती मयत झाला कि त्याच्या पत्नीचे आभूषण काढले जातात, बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्रे काढले जाते, पायातील जोडवी काढली जाते, कपाळावरील कुंकू पुसले जाते, हळदी कुंकू कार्यक्रमाला तिला बोलावले जात नाही. असा जी. आर. सुद्धा महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे त्या अनुषगाने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ठेवण्यात आला व तो एक मतांनी मंजूर झाला.

शिवाजी माझ्या घरात जल्माला यावा पण माझ्या घरात नाही शेजारच्या घरात जल्मला तर शिवाजी माझ्या घरात जल्माला यावा हे प्रत्येकाला वाटायला हवे तरच आपला महाराष्ट्र नाही आपला देश प्रगती पथावर जायील. सौ. दिपाली दिलीप मोरे खोपोली….
ह्या शिबिरास सदानंद गायकवाड, आबासाहेब पवार (अध्यक्ष), प्रकाश माने, संदीप ना, गजानन नागे,राजेंद्र नागे,निलेश पवार, प्रशांत करमत, गणेश वडतीले, उमाजी माडेकर, संदीप जामकर,उल्का माडेकर, ज्योती माने, अनिता पवार, स्नेहल नागे, रेश्मा सोंडकर, सुनिता सावंत, श्रुती वाडेकर, शिवाजी कोरडे, अंकिता मोरे, दीपक गायकवाड, तुषार सोंडकर, सूर्यकांत सोंडकर, राजू सुरवसे, विकास सावंत, गणेश मोरे, दिलीप मोरे, राकेश किल्लेकर, किशोर गायकवाड, कल्पेश खैरे, सुरेंद्र सोनकर, दर्शन पवार, अशोक पवार, सागर सूर्यवंशी, दीपिका गायकवाड, प्राची किल्लेकर, आरती सूर्यवंशी, सुरेखा सोनकर, शितल नागे, दिपाली मोरे, रुपेश मोहिते, रूपाली मोहिते,
सौ.रुख्मिणी कोरडे,विजय कोरडे,सौ.अंकिता मोरे, भरत पवार,निलेश नागे,दर्शन पवार,सागर सुर्यवंशी,शिवाजी कोरडे,अनिल वारलेकर,मधुकर सोंडकर,सौ.सोनू माडेकर,गणेश वर्तले,अरुण मोरे
महिला विभाग कार्य क्रमात हळदी कुंकू सोहळ्यात उपस्थित महिलांनी तिळगूळ, वाण सोबत आनंद ही लुटला. मार्गदर्शन शिबिर, विधवा प्रथा बंद करणे, अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान २०२४ दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. असे मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम पार पडला. सुग्रास भोजनानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचा आदराने निरोप घेतला.