नागपूर ते नागभीड रेल्वे दिवाळी नंतर सुरू होणार

25

नागपूर ते नागभीड रेल्वे दिवाळी नंतर सुरू होणार

नागपूर ते नागभीड रेल्वे दिवाळी नंतर सुरू होणार

त्रिशा राऊत नागपुर जिला ग्रामीण प्रतिनिधि
मो 9096817953

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

उमरेड.उमरेड कोलमाइन्स येथील कोळसा बुट्टेबोरी, कोराडी, खापरखेडा येथे मालगाडी जाणारा
नागपूर – नागभीड हा नागपूर गेज परिवर्तन प्रकल्प २२०० कोटी रुपये खर्च करून महारेल वतिने तयार करण्यात येत आहे. इतवारी ते उमरेड पर्यंत ५५ किमी रेल्वेच्या मार्गाचे काम पुर्ण झाले असून इतवारी ते नागभीड ब्रॉडगेज चे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पुर्ण होणार असल्याची माहिती दक्षिण पुर्व – मध्य रेल्वेचे व्यवस्थापक दिपक कुमार गुप्ता यांनी नागपूर येथे दि. ४ फरवरीला पत्रकारांना दिली आहे. उमरेड रेल्वेच्या कार्यालय काम, बगीचा, रंगरंगोटी व इलेक्ट्रीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. येथे

रेल्वे पटरीचे दोन ट्रक आहे एका ट्रॅकवर तीन पटरी आहे. तर दुसऱ्या ट्रॅकवर दोन पटरी ची व्यवस्था दिसून येत आहे. लगत असलेली पटरी उमरेड कोलमाइन्स मधील कोळसा बुट्टेबोरी, खापरखेडा, कोराडी, महाजनको, अडाणी पॉवर प्लॉट येथे मालगाडी जाणार असल्याची माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे. तसेच उमरेड ते भिवापूर पर्यंत रेल्वे पटरी टाकण्याच बरेच काम झाले आहे. उमरेडच्या तुलनेत भिवापूर येथील रेल्वे इमारतीचे काम बरचस पुर्ण झाल्याचे दिसून येत आहे. येथे तीन रेल्वे पटरी व्यवस्था आहे. काही जागी वनविभागाच्या अडचणीमुळे कारगाव जवळ पुलाचे काम रखडले होते. तसेच याच मार्गाजवळील नवेगाव देशमुख वनविभागाच्या विश्रामगृहा जवळ वन्य प्राण्याला ये-जा करण्याच्या मार्ग व्यवस्था महारेल कडून करण्यात येत आहे. सदरचे काम जलद गतीने सुरु आहे.शंकतुला प्रवास सहा वर्षापूर्वी इतिहास जमा झाला असून दिवाळी नंतर आता ब्रॉडगेज मार्गावरून रेल्वे सुरू झाल्यास उमरेड, भिवापूर येथिल दळणवळण, उदयोग व इतर व्यवसायांना बुस्ट मिळणार आहे हे निश्चित.