पत्रकारांनी कांहीं तत्व जपली नाहीत तर बदलत्या काळात पत्रकारांबाबत असलेला आदरभाव कमी होईल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे प्रतिपादन

41

पत्रकारांनी कांहीं तत्व जपली नाहीत तर बदलत्या काळात पत्रकारांबाबत असलेला आदरभाव कमी होईल
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे प्रतिपादन

पत्रकारांनी कांहीं तत्व जपली नाहीत तर बदलत्या काळात पत्रकारांबाबत असलेला आदरभाव कमी होईल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे प्रतिपादन

महाड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-पत्रकारांनी नेहमी नाण्याची दुसरी बाजू देखील पाहिली पाहिजे अशी तत्व जर जपली नाहीत तर पत्रकारांच्या बाबतीत असलेला आदर भाव बदलत्या काळात नष्ट होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केले. महाड पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाड पत्रकार संघ यांच्यामार्फत पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विचारपीठावर वन क्षेत्रपाल राकेश साहू, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या मनीषा नगरकर, राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमधाडे, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह ऐतिहासिक महाड नगरीतील पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.
यावेळी व्यासपीठावरील ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा स्व. रवींद्र पाटील निर्भीड पत्रकारिता पुरस्कार अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार रायगड टाइम्स चे संपादक राजन वेलकर यांना प्रदान करण्यात आला. तर स्व. डॉ.मोहम्मद शफी पूरकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार मुरुड येथील पत्रकार शेख सिराज हाशम यांना, स्व. दीपक साळुंखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार तळा येथील पत्रकार विराज टिळक यांना, स्व. दिपक शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार माणगाव येथील पत्रकार अरुण पोवार यांना बहाल करण्यात आला. तसेच महाड पत्रकार संघातील सदस्य गोपाळ कांबळे व रघुनाथ भागवत यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले.
यावेळी हेमंत देसाई यांनी महाडच्या ऐतिहासिक भूमीचा उल्लेख करत काळकर्ते शि.म. परांजपे, दत्तो वामन पोतदार, नाना पुरोहित, मोहन धारिया, यशवंत टिपणीस यांच्या नावांचा उल्लेख करून महाड ऐतिहासिक भूमीला लाभलेले हे खरे हिरे होते असे सांगितले. तर ज्यांनी लिहिणे अपेक्षित आहे ते लिहीत नाहीत आणि ज्यांना वाचायला पाहिजे ते वाचत नाहीत अशा शब्दात मोबाईल संस्कृतीवर भाष्य केले. पत्रकारांची होणारी ससेहोलपट थांबवायची असेल तर समाजाने देखील पत्रकारांना चांगले स्थान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. महाड यावेळी व्यासपीठावरील मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करताना मनीषा नगरकर, राकेश साहू यांनी आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याबद्दल कौतुक व्यक्त करून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले.
यावेळी स्वर्गीय रवींद्र पाटील निर्भीड पत्रकारिता पुरस्कार प्राप्त आलिबाग येथील संपादक राजन वेलकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना महाड पत्रकार संघाचे विशेष आभार मानले. महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव रोहित पाटील, खजिनदार राजेंद्र जैतपाळ, उदय सावंत, श्रीकांत सहस्रबुद्धे, रघुनाथ भागवत, निलेश लोखंडे, चंद्रकांत कोकणे, गोपाळ कांबळे, नितेश लोखंडे, योगेश भामरे, सुधीर सोनार, किशोर किर्वे आणि तुकाराम साळुंखे आधी सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेऊन पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अविनाश घोलप, तर उपस्थितांचे आभार राजेंद्र जैतपाळ यांनी मानले.