कोप्रोली शाळेत रांगोळी स्पर्धा संपन्न

208

कोप्रोली शाळेत रांगोळी स्पर्धा संपन्न

कोप्रोली शाळेत रांगोळी स्पर्धा संपन्न

रुद्रानी कोळी च्या रांगोळीचे कौतुक

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-वि‌द्यार्थ्याच्या कला गुणांचा विकास होणे गरजेचे आहे.त्या निमित्त रा.जि. प. शाळा कोप्रोली येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये इ.४ थीते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अप्रतिम रांगोळ्या रेखाटल्या इ. ७ वी मधील कु. रुद्रानी दत्तगुरु कोळी या विद्यार्थीनीने कोल्हापूरची अंबामातेची अप्रतिम रांगोळी काढून सर्व पालक, शिक्षक वृंद व उपस्थितीचे लक्ष वेधून घेतले .या स्पर्धचे परिक्षण धोकवडे शाळेचे शिक्षक अनय पेढवी यांनी केले.
शाळा हे संस्कारांचे केंद्र आहे. शाळा म्हणेने ज्ञानाची शिदोरी आहे. शाळा म्हणजे अनुभवाची खाण आहे. शाळा म्हणजेच आपले विविध गुणदर्शन घडविणारी विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ यासाठीच रा.जि.प. शाळा-कोप्रोली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासा साठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये क्रिडास्पर्धा, कथाकथन, गीतगायन प्रश्नमंजूषा, पाढे पाठांतर, स्पेलिंग पाठोत्तर व उलट पाढे स्पर्धा शाळा स्तरावर घेतल्या गेल्या या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्या सौ. संध्या पाटील , विषय शिक्षिका सौ. ज्योती पाटील , उपशिक्षक नित्यनाथ म्हात्रे, विजय पाटील, श्रीम. श्राव्या मॅडम यांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी पार पाडल्या.
या सर्व स्पर्धा मध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.