नशेचे इंजेक्शन देऊन 22 वर्षीय तरुणीवर 60 जणांचा केला सामुहिक बलात्कार.

60

नशेचे इंजेक्शन देऊन 22 वर्षीय तरुणीवर 60 जणांचा केला सामुहिक बलात्कार.

A 22-year-old girl was gang-raped by 60 people after injecting her with drugs.
A 22-year-old girl was gang-raped by 60 people after injecting her with drugs.

✒️प्रशांत जगताप क्राईम रिपोर्टर✒️
राची, दि. 5 मार्च:- आज महिला अत्याचारामध्ये मानूस किती हैवान झाला आहे हे अनेक घटना वरुन समोर येत आहे. झारखंडमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन 60 नराधमांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला आहे. तब्बल एक एकाने आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडीत तरुणीने म्हटले आहे.

झारखंड मधिल सराकेला भागात रहणा-या एका 22 वर्षीय तरुणीवर 60 जणांनी सामुहिक बलात्कार केल आहे. तब्बल एक महिना तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर आत्याचार करण्यात आले. पीडित तरुणी जमशेदपूरची असून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी पीडित तरुणीची चौकशी केली, तेव्हा सदर तरुणीची मानसिक स्थिती बिघडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या तरुणीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीच्या शरीरावर सुईचे खुणा सापडल्या असून तिच्या डोळ्यालाही मार लागल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनीही सामुहिक बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून याचा सखोल तपास सुरू आहे.