ठाणे महिला नगरसेवीकेच्या घरात घुसून भाजपा नगरसेवकाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न.

48

ठाणे महिला नगरसेवीकेच्या घरात घुसून भाजपा नगरसेवकाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न.

भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांच्यावर याप्रकरणी  आयपीसी कलम 452 बळजबरी घरात प्रवेश, 354 विनयभंग, 354 अ लैंगिक छळ आणि 506 धमकावणे अंतर्गत कारवाई करण्यात आली.

Attempt to break into the house of a Thane woman corporator and humiliate a BJP corporator.

Attempt to break into the house of a Thane woman corporator and humiliate a BJP corporator.

राजु मोरे प्रतीनिधी ✒
ठाणे, दि.05 मार्च:- आज महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे मध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाने एका महिला नगरसेवीकेच्या घरात शिरुन त्यांच्या विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धकादायक बातमी समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना ठाणे पोलिसानी अटक केली आहे. त्यांना अटक महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी झाली आहे. तेलवणे यांच्यावर एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती गुरुवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

दि.04 मार्च मध्यरात्री जवळपास 12 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास मुरबाडचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी घरात घुसून नगरसेवक असलेल्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. याप्रकरणी तेलवणे यांच्यावर आयपीसी कलम 452 बळजबरी घरात प्रवेश, 354 विनयभंग, 354 अ लैंगिक छळ आणि 506 धमकावणे अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले. एकीकडे राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंवर झालेले आरोप आणि त्यानंतर अलिकडेच पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आलेला असताना, आता घरात घुसून महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.