कळमेश्वर बाम्हणी न. पा. मुख्याधिकारी बाह्य दबावाखाली करीत आहे कारभार: नगरसेवक धनराज देवके

Bamhani No. in Kalmeshwar taluka. Pa. Chief Officer is acting under external pressure: Corporator Dhanraj Devke
✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर, दि. 5 मार्च:- कळमेश्वर बाम्हणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे या रुजू झाल्यापासून बाह्य दबावाखाली प्रशासनाच्या नियमबाह्य कारभार करीत आहे असा आरोप नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष धनराज देवके यांनी 3मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषद घेऊन केला.
सभागृहात नगराध्यक्ष यांचेवर महिला कुटुंबातील व्यक्ती बहुमताचे जोरावर दबावाचा वापर करून मुख्य अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियमबाह्य कामे करून घेतात. सभेचे इतिवृत्त सभासदांना देताना मुख्य अधिकारी यांनी कायद्याचे व स्वतःचे मत नोंदविणे आवश्यक असून ते नोंदविले जात नाही. इतिवृत्त प्रसंगी बाह्य मंडळी स्वतःच्या मर्जीने इतिवृत्त लिहून घेतात असा थेट आरोप करून शहरातील कामाची गुणवत्ता ढासळलेली असून अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन करून कंत्राटदाराशी संगनमत करून गुणवंता हीन कामे सुरू आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान, होऊन भ्रष्टाचाराला वाव आहे. शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी हल्ली अस्तित्व नसलेल्या कोलार नदीचा 42 कोटीच्या प्रस्तावाची योजना असून त्यावर 42 लाख लोकवर्गणीचा भरणा प्रशासनाकडे करायचा असतो. यापूर्वी 2 प्रस्तावावर 2 कोटींचा चुराडा शहरवासीयांचा झाला आहे .तसेच नवीन विकास आराखड्यासाठी 1 कोटी 81 लाख खर्च होऊन अद्याप अस्तित्वात आलेली नाही. कोच्ची बॅरेक चा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी असताना काही त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे पत्र आले असता त्यांनी त्रुटीची पूर्तता केली नाही. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले यामुळे 60 कोटींचा प्रस्ताव बारगळला व आर्थिक हानी झाली याला जबाबदार कोण असा रोखठोक सवाल २६ फेब्रुच्या सर्वसाधारण सभेमध्ये केला त्यावेळी मुख्य अधिकाऱ्यांनी सभागृहातुन काढता पाय घेतला असे सांगून त्यांच्या काल खंडातील कारभाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्र परिषदेतून केली. यावेळी पत्रकार परिषदेला नगरसेवक धनराज देवके, नामदेव वैद्य, सुनील चूनारकर प्रामुख्याने उपस्थित होते.